तुम्ही कार्ल्सबर्ग ग्लासची एक जाहिरात पाहिली होती का? या जाहिरातीत बोर्ड मिटिंग स्विमींग पूलमध्ये करण्यात आल्याचे दाखवले होते. तशी ही जाहिरात..आता प्रत्यक्षात आपल्याकडची मिटिंग कशी होते हे वेगळं सांगायला नको. सुटाबुटातला बॉस, एसीतही घामाच्या धारा जिथे वाहतात अशी मिटिंगरूम, मोठ्या प्रोजेक्टरवर सुरू असणारे प्रेझेंटेशन आणि तणावात असणारे इतर कर्मचारी अशा प्रकराच्या मिटिंगची आपल्याला सवय झालीय. त्यातून आपल्याकडचा विनोदाचा आणि विरोधाभासाचा भाग म्हणजे गरिबांचा विकास करण्याच्या बाता मारणारेही लोक प्रत्यक्षात मात्र पंचतारांकित हॉटेल्सच्या मिटिंगरुममध्ये बसून मिटिंग घेतात नाही का?

पण हे सीईओ थोडे वेगळे आहे. बाँड सफारी आणि हॉटेल समुद्र यांच्या तर्फे सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ‘ओशन लव्ह’ ही मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत पाच कंपन्यांचे सीईओ सहभागी झाले होते. पृथ्वीचा सर्वधिक भाग हा पाण्याने व्यापला आहे. या सागरात पृथ्वीवरची निम्म्याहून अधिक जैवविविधता आढळते. पण वाढत्या प्रदूषणामुळे या जैवविविधतेला धोका पोहोचत चालला आहे आणि यासाठीच नव्या उपाययोजना राबवण्यात येत आहे. म्हणूनच टाटा, एव़ॉन, युएसडी समूहाच्या सीईओंनी एकत्र येऊन संवर्धन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जमलेल्या सगळ्या सीईओंनी समुद्रात ३५ मिनिटे घालवून समुद्रातल्या जैवविविधतेचे संर्वधन करण्याची शपथ यावेळी घेतली आहे. कोवालमच्या ग्रोव्ह बीचवर ही अनोखी मिटिंग घेण्यात आलीय.