सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यात लहान मुलांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. त्यामुळे असे व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असतात. लहान मुलांची बुद्धीमत्ता पाहून अनेकदा आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. लहान मुलांना सर्वाधिक अडचण असते ती उंचावर ठेवलेली वस्तू मिळवण्याची. पालकांना याचा अंदाज असल्याने पालक कायम वस्तू लहानग्याच्या हाताला लागू नये यासाठी उंचीवर ठेवतात. पण या व्हिडीओतील लहानग्याचा देशी जुगाड पाहून तुम्हीही आवाक होऊन जाल.

व्हायरल व्हिडीओत एका उंच टेबलावर खाऊ ठेवलेला दिसत आहे. मात्र खाऊ उंचीवर लांब असल्याने तिथे पोहोचणं लहानग्याला शक्य होत नाही. मात्र मुलगा हार न पत्कारता आपल्या बुद्धीमत्तेचा वापर करतो. एका कार्डबोर्डच्या मदतीने खाऊचं भांडं आपल्याकडे खेचतो. इतक्या लहान वयात मुलाची बुद्धीमत्ता पाहून नेटकरी त्याला शाबासकी देत आहेत. आयपीएस अधिकारी दीपांशु कालरा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच ‘दिमाग का पूरा-पूरा इस्तेमाल…’ अशी कॅप्शन दिली आहे.

लहानग्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत २५ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. तसेच व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.