सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ थक्क करणारे असतात तर काही अंगावर काटा आणणारे असतात. सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. दरम्यान, सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. दरम्यान व्हायरल व्हिडीओमध्ये एक लहान मुलं गाडीच्या खाली आले होते पण लोकांच्या माणुसकीमुळे त्याचा जीव वाचला.

इंस्टाग्रामवर officialdivine अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला दुचाकीवरून जात आहे आणि अचानक तिच्या मागे बसलेले लहान मुल गाडीवरून खाली पडते. तेवढ्यात मागून एक कार येते आणि ते मुलं त्याखाली अडकते. सुदैवाने कारचालकाने तिथेच कार थांबवली आहे. पण लहान मुलाला बाहेर काढता येईना. मुलांची आई जोरजोरात ओढताना दिसत आहे. हे पाहून आसपासचे लोक मदतीसाठी पुढे येतात. सर्वजण मिळून कार उचलतात आणि लहान मुलाला बाहेर काढतात. लोकांच्या माणसुकीमुळे चिमुकल्याचा जीव वाचला.

हेही वाचा – धक्कादायक! मटणाच्या नावाखाली लोकांना खायला देत होते ‘मांजराचे मांस’; पोलिसांनी १००० मांजरांची केली सुटका

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. दरम्यान लोकांच्या मदतीचे लोक कौतूक करत आहे.

.