Shameless Sales Training Skills: कोणतेचं काम सोपे नसते. प्रत्येक कामामध्ये काही ना काही अडचणी, आव्हाने असतात. या अडचणींवर मात करून, आव्हानांचा सामना करत काम पूर्ण करावे लागते. आजच्या काळात बहुतांश लोक नोकरी-व्यवसाय करतात. कोणतीही नोकरी करा किंवा कोणताही व्यवसाय करा कष्ट करावेच लागतात. कामाच्या प्रचंड दाबावा खाली काम करावे लागते. शेवटी, कोणत्या कामाचा दबाव नाही? आजच्या काळात स्वत:चे कौशल्य वाढवणे आणि स्वत:ला अग्रेसर ठेवणे खूप गरजेचे आहे. स्पर्धेच्या या युगात, लोक स्वतःला इतरांपेक्षा चांगली कामगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात, जेणेकरून त्यांना चांगल्या पगाराबरोबरच कंपनीतही खूप मान मिळेल. यामुळेच काही कंपन्या अशा आहेत ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण देत असतात, परंतु अलीकडेच एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना असे प्रशिक्षण देत आहे,जे ऐकल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. चायनामधील ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण देत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की,”ते जितके निर्लज्ज असतील तितका त्यांचा पगार जास्त असेल.”

प्रशिक्षणासाठी कोटींमध्ये केला खर्च

भारताचा शेजारी देश चीनच्या एका कॉस्मेटिक कंपनीबद्दल सांगणार आहोत, जी मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी कर्माचाऱ्यांना अशा गोष्टीचे प्रशिक्षण देत आहे. ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. याआधी तुम्ही कधीही असे प्रशिक्षण पाहिले नसेल किंवा ऐकले नसेल. ही कंपनी कर्मचाऱ्यांना सांगते की, ते जितके निर्लज्ज होतील तितका त्यांचा पगार वाढेल. या प्रशिक्षणासाठी कंपनीने कोटींमध्ये पैसे खर्च केले आहे आणि आपल्या कर्माचाऱ्याने निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण दिले आहे. ही विचित्र घटना चीनच्या पूर्वेकडील प्रांतातील झेजियांग प्रांतातील हांगझोउ(Hangzhou) येथे स्थित एक कॉस्मेटिक कंपनीमध्ये घडली आहे.

कंपनी देत आहे निर्लज्ज होण्याचे प्रशिक्षण

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या मते, “जेव्हा कर्मचाऱ्यांना लाज वाटणार नाही तेव्हाच त्यांची विक्री वाढेल. या विशेष प्रशिक्षणासाठी कंपनीने जुहाई एंटरप्राइज मॅनेजमेंट कन्सल्टिंगची नियुक्ती केली आहे. यामागील कारण म्हणजे २०२० पासून कंपनीची विक्री कमी होत होती. कोरोनाच्या काळापासून कंपनीला खूप संघर्ष करावा लागत होता. अशा परिस्थितीत बाजारात टिकून राहण्यासाठी कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना हे विशेष प्रशिक्षण देण्याचा विचार केला. कर्मचाऱ्यांना चांगली विक्री करता यावी यासाठी कंपनी हा प्रयोग केला आहे. या प्रशिक्षणाद्वारे कर्मचाऱ्यांना नृत्य करून आणि टाळ्या वाजवून विक्रीला प्रोत्साहन देण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सोशल मीडियावर लोकांना या कंपनीच्या प्रशिक्षणाची माहिती मिळताच लोकांनी कमेंट केल्या. यावर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांचे म्हणणे आहे की, “जर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये पैसे वाटले असते तर उत्पादकता आपोआप वाढली असती.”