आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जमान्यात सर्व काही शक्य आहे. शिवाय AI च्या मदतीने लोक अनेक वेगवेगळी काम काही क्षणात करताना दिसत आहेत. अनेकजण तर आपण कल्पनाही करु शकत नाही अशा गोष्टींची निर्मिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करत आहेत. याबाबतचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे पाहून आपणही आश्चर्यचकीत होतो.

सध्या अशीच एक आश्चर्यचकीत करणारी घटना उघडकीस आली आहे. ती म्हणजे एका तरुणाने AI च्या मदतीने आपल्या मृत आजीला जिवंत केलं आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला धक्का बसेल पण हे खरं आहे. कारण या तरुणाने एआय कॅरेक्टरद्वारे आपल्या आजीशी आभासी संवाद साधला असून या संवादाचा ऑडिओ आणि व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

हेही पाहा- लेडीज सीटवर पुरुष बसल्याने दोन बायकांमध्ये राडा; Video पाहून लोक म्हणाले, “फ्री तिकीटचा परिणाम”

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण चीनमधील असून व्हायरल व्हिडिओमध्ये २४ वर्षीय वू आजीला म्हणतो, ‘आजी, मी आणि वडील तुझ्यासोबत लूनर नववर्ष साजरे करण्यासाठी गावी परत जाणार आहे. वडिलांनी तुला शेवटचा फोन केला. तेव्हा तू त्यांना काय म्हणाली होतीस?’ नातवाने विचारलेल्या या प्रश्नावर एआय आजी म्हणजे, ‘मी त्याला वाईन पिऊ नकोस असे सांगितले होते. शिवाय बतच कर आणि पत्ते खेळू नको, असंही सांगितलं होतं.

कोरोनामुळे आजीचा मृत्यू –

व्हिडिओमध्ये वू म्हणतो, ‘हो आजी, तु त्यांना तसे करायला सांगितलं पाहिजे, कारण ते अजूनही ते रोज वाईन पितात. त्याच्याकडे कोणतीही बचत नाही. आजी, नवीन वर्षासाठी तुम्ही काय खरेदी केले आहे?’ या प्रश्नावर AI आजी म्हणते. ‘मी खाद्यतेलाच्या दोन बाटल्या विकत घेतल्या आहेत. ते तेल शेतकऱ्यांनी स्वतः बनवले आहे. तेलाचा छान वास येतोय, ती बाटली ७५ युआनची आहे.

हेही पाहा- बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना बघून महिला झाली बेभान; मिठी मारली, किस केलं अन्… Video पाहून भक्तही थक्क

या संवादादरम्यान, एआय आजीने केलेली हावभावही खरी वाटत होती. तर वू त्याच्या आजीवर खूप प्रेम करत होता. आजीचे वयाच्या ८४ व्या वर्षी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. वूच्या पालकांच्या घटस्फोटानंतर, आजीनेच त्याला सांभाळलं होतं, वू शांघायमध्ये व्हर्च्युअल आर्ट डिझायनर म्हणून काम करत होता.

वूने आजीला शेवटचा निरोप दिला नव्हता –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जमान्यात सर्व काही शक्य आहे. शिवाय AI च्या मदतीने लोक अनेक वेगवेगळी काम काही क्षणात करताना दिसत आहेत. शिवाय अनेकजण तर आपण कल्पनाही करु शकत नाही अशा गोष्टींची निर्मिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करताना दिसत आहेत. याबाबतचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. जे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होतात.