JCB Excavator Used To Loot ATM In Maharashtra: पोलिसांना फसवण्यासाठी गुन्हेगार असे काही धक्कादायक प्रकार वापरतात की ते पाहून जगाला धक्का बसावा! असेच एक ताजे प्रकरण समोर आले आहे. ही घटना महाराष्ट्रातल्या सांगली इथली आहे. एटीएम मशीन लुटण्यासाठी चोरांनी चक्क बुलडोझर आणला. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सीसीटीव्हीपासून लपण्यासाठी चोरट्यांनी बुलडोझरने संपूर्ण एटीएम मशीनच उखडून पळ काढलाय.

हे सीसीटीव्ही फुटेज यूट्यूबवर ‘व्हायरल स्ट्रिंगर’ नावाच्या अकाउंटवरून शेअर केलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय की, ही घटना २३ एप्रिलच्या रात्री घडली. अॅक्सिस बँकेच्या एटीएमच्या सीसीटीव्हीमध्ये एक व्यक्ती एटीएममध्ये शिरताना दिसून येतोय. त्यानंतर लगेच निघून गेल्याचं दिसत आहे. त्यानंतर चोरट्याने बुलडोझरच्या सहाय्याने बूथचा दरवाजा तोडून एटीएम मशीन बाहेर खेचले. मशीनमध्ये २५ लाख रुपये रोख असल्याचं सांगण्यात आलंय. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, एटीएम केंद्रावर जेसीबीने तोडफोड केल्याने सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात हार्डवेअरचे दुकान लुटल्यानंतर चोर नाचताना दिसून आला. ही घटना पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाजवळ घडली. दुकानाचे मालक अंशू सिंह यांनी सांगितले की, चोरट्याने हजारो रुपयांची रोकड आणि सामान चोरून नेले. मात्र, नंतर दुकानातील सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला पकडण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, या घटनेबाबत आयपीसीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. चोरीसाठी वापरलेला जेसीबी सुद्धा या परिसरातूनच चोरीला गेल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलीस एटीएम चोराचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा : खोदली कबर आणि निघाला जिवंत व्यक्ती…नातेवाईकांनी केलं होत दफन; हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा : बापरे! एका रसगुल्ल्यावरून नवरदेव-नवरीने एकमेकांना धू-धू धुतलं; हा VIRAL VIDEO पाहून व्हाल शॉक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

CCTV क्लिप व्हायरल झाल्यानंतर, काही सोशल मीडिया युजर्स त्याला ‘मनी हेस्ट 2023’ म्हणत आहेत! या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे, तर काहीजण या चोरीसाठी बेरोजगारीला जबाबदार धरत आहेत. ते म्हणतात की, बेरोजगारी आणि भुकबळी ही दोन मुख्य कारणे आहेत, जी लोकांना गुन्हेगारीकडे वळवत आहेत.