पाणीपुरी हे भारतीयांचं आवडतं खाद्य आहे. खासकरून तरुण पाणीपुरी खाणं पसंत करतात. गेल्या काही वर्षात पाणीपुरी विक्रेत्यांनी अनेक प्रयोग करत पाणीपुरीच्या नव्या डिश समोर आणल्या आहेत. याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. लखनौमधील एका विक्रेत्याने चौमेन पाणीपुरी तयार केली आहे. या रेसिपीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

विक्रेता सर्वात प्रथम साध्या पाणीपुरीप्रमाणे त्यात बटाट, चणे आणि वेगवेगळे मसाले टाकतो. त्यानंतर त्यावर गोड चटणी टाकतो. इथपर्यंत सर्व ठीक आहे. त्यानंतर दुकानदार त्यावर नूडल्स आणि सॉस टाकतो. तसेच दही टाकून तुटीफ्रुटीने सजवतो. तसेच शेवटी कोथिंबीर आणि दोन चटण्या ठेवून वाढतो. हा व्हिडिओ पाहून अनेक खाद्यप्रेमींनी आपलं मत मांडलं आहे. आरजे रोहनने शेअर केलेल्या व्हिडीओला “हॅलो फ्रेंड्स उलटी करा, तुमच्या पाणीपुरी खाणाऱ्या मित्राला टॅग करा”, अशी कॅप्शन लिहिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाद्यप्रेमींनी ही रेसिपी म्हणजे कळस असल्याच्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, हा तर पाणीपुरीवर अन्याय आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, काही दिवसांनी पाणीपुरी नामशेष होईल.