अमेरिकेतल्या कोलोरॅडो राज्यातील जिल्हा शाळांनी आपल्या शिक्षकांना आणि शाळेतली इतर कर्मचा-यांना चक्क सोबत बंदुका जवळ बाळगण्याची परवानी देण्याचे ठरवले आहे. जर शाळेच्या परिसरात गोळीबार झालाच तर सुरक्षेच्या कारणासाठी शिक्षकांकडे आणि इतर कर्मचा-यांकडे बंदुका असाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
VIDEO : स्वाइप मशीन घेऊन भीक मागणा-या भिका-याचे सत्य उघड
कोलोरॅडोमधल्या जिल्हा शाळांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे. शाळेत गोळीबार किंवा तशीच कोणतीही आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर याठिकाणी पोलिसांना पोहचायला जवळपास वीस मिनीटांचा आवधी लागले. तेव्हा याकाळात सुरक्षा म्हणून शाळेतील शिक्षकांना आणि इतर कर्मचा-यांना सोबत बंदुका बाळगण्यास परवानगी देण्यात आली आहे. या बंदुकींचा वापर कसा करावा यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
इमोजींचा अर्थ सांगा अन् नोकरी मिळवा!
सँडी हुक एलिमेंटरी शाळेत १४ डिसेंबर २०१२ मध्ये एका २० वर्षांचा तरुणाने गोळीबार केला होता. या तरुणाने ६ ते ७ वयोगटातील लहान मुलांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात २० मुलांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेत अनेकांकडे बंदुका सहज उपलब्ध असतात. तेव्हा रागाच्या भरात एखाद्या विद्यार्थ्याकडून गोळीबार होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले आहे. यावर अर्थातच शाळेतील शिक्षकांची मते देखील विचारात घेतली जाणार आहे. मतदान प्रक्रियेद्वारे निर्णय घेण्यात आल्यानंतर बंदुका वापरण्यास परवानी देण्यात येईल.