पश्चिम बंगालच्या भाजपा कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चिनी सामानावर बहिष्कार टाकण्याच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या आसनसोल येथील भाजपा कार्यकर्त्यांनी चीनचा निषेध करण्यासाठी रॅली आयोजित केली होती. पण, या रॅलीमध्ये त्यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याऐवजी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनचा पुतळा जाळल्याचं समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडिओमध्ये निषेध रॅलीबाबत माहिती देताना भाजपाचा कार्यकर्ता, “आम्ही चीनचा विरोध करतोय…लडाखमध्ये जे झालं त्याविरोधात आम्ही निषेध रॅली काढली आहे…चीनचे जे पंतप्रधान आहेत किम जोंग त्यांचा आम्ही पुतळा जाळून निषेध करणार आहोत”, असं म्हणताना दिसतोय. लोकांनी चीनचं सामान न वापरता स्वदेशीचा अवलंब करावा, त्याद्वारे चीनला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करु, असंही आवाहन या कार्यकर्त्याने केलं. शी जिनपिंगऐवजी किम जोंग उनचा पुतळा जाळणार असं म्हणणाऱ्या या भाजपा कार्यकर्त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.


दरम्यान, निषेध करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना कोणाचा पुतळा जाळायचा आहे याचीच माहिती नसल्याने यावरुन नेटकरी भाजपाला जोरदार ट्रोल करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confused bjp bengal workers took out a rally to burn kim jongs effigy sas
First published on: 19-06-2020 at 08:06 IST