Self Driving Car:  टारझन द वंडर कार हा चित्रपट तुमच्यातील अनेकांनी पहिला असेल. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सेल्फ ड्रायव्हिंग करणारी खास कार होती. पण, अशी कार भारतात प्रत्यक्षात असती तर असा चित्रपट पाहून आपल्यातील बहुतांश लोकांनी विचार केला असेल. तर आज सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत असंच काहीस पाहायला मिळालं आहे. भारतातील रहदारीच्या रस्त्यावर एक सेल्फ ड्रायव्हिंग कार धावते आहे; जे पाहून एका व्यक्तीनं पोस्ट शेअर केली आहे.

संजीव शर्मा हे स्टार्टअप स्वायत्त रोबोट आणि दीप आयगेनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. भोपाळच्या या स्टार्टअपने चालकाशिवाय वाहन चालवण्याचे तंत्रज्ञानाचे वापरले आणि चालकाशिवाय धावणारी महिंद्रा बोलेरो एसयूव्ही कार तयार केली. तर हा व्हिडीओ पाहून स्वतः सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी देखील या स्टार्टअपचे कौतुक केले होते.पण, आता एका अज्ञात व्यक्तीने पोस्ट शेअर केली आहे आणि आश्चर्य व्यक्त केलं आहे.

हेही वाचा…VIDEO: शिक्षकांनी वर्गात तयार केला स्विमिंग पूल; खुर्ची, टेबल काढल्या अन्…. विद्यार्थ्यांनी मनसोक्त लुटला आनंद

व्हिडीओ नक्की बघा…

भारतात वाहन चालवणाऱ्या अन्य वाहन चालकांना बघता भारतात सेल्फ ड्रायव्हिंग वाहने कशी कार्य करू शकतील याचा एका व्यक्तीला नेहमी प्रश्न पडायचा. कारण – माणसं आणि प्राणी अनेकदा रस्त्यावरून चालत असतात काही वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे या सेल्फ ड्रायव्हिंग एसयूव्ही बद्दल त्यांना चिंता वाटली. पण, हा व्हिडीओ पाहून व्यक्ती खूप प्रभावीत झाली आहे. कारण – ६:३८ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये भोपाळच्या रहदारीच्या रस्त्यावर सेल्फ ड्रायव्हिंग कारचा एक सुंदर डेमो दाखवण्यात आला आहे ; असे एकंदरीतच व्यक्तीचं म्हणणे आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, गाडीच्या आतमध्ये कॅमेरा बसवण्यात आला आहे. जेणेकरून रस्त्यावर धावणाऱ्या बोलेरो मॉडेलच्या कारमध्ये कोणताही चालक नाही, कारचे स्टीयरिंग व्हील आपोआप वळताना दिसत आहे हे स्पष्ट होत आहे आणि हे पाहून तुमचा या गोष्टीवर विश्वासही बसेल. रहदारीच्या रस्त्यावर, प्राणी, माणसे यांना पाहून देखील ही गाडी अगदी व्यवस्थित वळणं घेऊन रस्त्यावर धावताना दिसते आहे हे पाहून शील मोहनोत (Sheel Mohnot) या युजरने @pitdesi एक्स (ट्विटर) अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे आणि या स्टार्टअपचे भरभरून कौतुक केलं आहे.