करोना विषाणूमुळे जगभरातील अनेक शहरे बंद करण्याची वेळ आली आहे. हवेमार्फत पसरणाऱ्या या संसर्गजन्य रोगाला थांबवण्यासाठी अनेक युरोपीय देशांनी संपूर्ण शहरेच लॉक डाऊन केली आहे. अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चीनमधील वुहानमधून सुरु झालेला करोनाचा प्रादुर्भाव आता ११० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. ज्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग झाला आहे त्यांनी स्वइच्छेने स्वत:चे विलगीकरण केलं आहे. अशा परिस्थित सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये एक वृद्ध व्यक्तीने स्वत:ला घराच्या एका खोलीमध्ये कोंडून घेतले आहे. त्या वृद्ध व्यक्तीचा मुलगा जेव्हा त्यांना भेटायला येतो तेव्हा तो खोली बाहेर उभा राहतो आणि त्यांच्याशी फोनद्वारे गप्पा मारतो. बाप-लेकांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Sandy Hamilton नावाच्या व्यक्तीने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्या व्यक्तीने या वृद्ध व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाला आहे आणि त्यांना भेटण्यासाठी त्यांचा मुलगा रोज येथे येतो असे त्याने म्हटले आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus this is how father son talk while lockdown avb
First published on: 18-03-2020 at 19:07 IST