स्पेनमध्ये करोनामुळे १५ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकजडाउनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचीही संख्या खूप आहे. याच लोकांवर पोलीस कारवाई करताना दिसत आहे. लॉकडाउनचा नियम मोडणाऱ्या अशाच एका महिलेवर पोलीस कारवाई केली आणि तिला न्यायलयासमोर सादर केले. मात्र न्यायालयाने तिला सोडून दिले. त्यानंतर ही महिला विवस्त्र होऊन पोलिसांच्या गाडीवर नाचू लागल्याची घटना स्पेनमधील टोरेमोलिनोस येथे घडली आहे. यासंदर्भातील वृत्त डेली मेलने दिले आहे.
लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी टोरेमोलिनोसमधील कोस्टा डेल सोल रिसॉर्टमधून एका महिलेला पोलिसांनी अटक केली. त्यांनतर तिला स्थानिक न्यायालयामध्ये न्यायाधिशांसमोर हजर करण्यात आले. मात्र न्यायाधिशांनी तिला समज देऊन सोडून दिले. या महिलेविरोधात तिच्या शेजारच्यांनीच पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस तिला अटक करण्यास आले असता तिने सहकार्य करण्याऐवजी विरोध करु लागली. अखेर पोलिसांनी तिला बेड्या घालून बळजबरीने ताब्यात घेतले. ही महिला ४१ वर्षांची असल्याचे समजते.
न्यायलयाने या महिलेला समज देऊन सोडल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी ही महिला विवस्त्र होऊन पोलिसांच्या गाडीवर चढून नाचली. काही पोलीस अधिकाऱ्यांनी या महिलेला गाडीवरुन खाली उतरवले आणि तिला असं न करण्याचा सल्ला देत समजण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या गाडीवर नाचल्याप्रकरणी या महिलेवर कारवाई झाली की नाही याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेले नाही.