Viral video: सोशल मीडियावर कोणताही व्हिडीओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनोरंजन करतात. नेटकरी असे अनेक व्हिडीओ व्हायरल करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सुरुवातीला तरुणांमध्ये असणारी रिल्सची क्रेझ आता सर्वच वयोगटातील लोकांमध्ये पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये एक कपल आणि त्यांच्या गोंडस चिमुकलीने नवीन पोपट हा या मराठी गाण्यावर धमाकेदार डान्स केला आहे.
२८ वर्षांपूर्वींच आनंद शिंदेंनी गायलेलं ‘जवा नवीन पोपट हा’ आजही लोकप्रिय गाणं आहे. त्या गाण्याची लोकप्रियता अजून ओसरली नाहीये. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, “आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या गं बोलण्याला, आता मी मानलं, शेजारचीही म्हातारी मैना लागली डोलायला, जवा नवीन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला…” या मराठी गाण्यावर आई-बाबा आणि त्यांच्या चिमुकलीनं भन्नाट डान्स केला आहे. यावेळी या कपलचे आणि चिमुकलीचे एक्सप्रेशन पाहून तुम्हीही त्यांचं कौतुक कराल एवढं नक्की.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या we_harshpuja_fan_club_1424 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला लाखो व्ह्युज आले आहेत.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आई वडील डान्स करतात तर चिमुकली का मागे राहिल” तर दुसऱ्याने ”छोटीला बघण्यासाठी १०० वेळा व्हिडिओ बघितलाय..भाई मुलीची ऍक्शन मस्त आहे आवडली आपल्याला” अशी कमेंट केली. तर तिसऱ्याने “सगळेच भारी…मुलीची ऍक्ट खुप भारी, ३६ चे ३६ गुण याला बोलतात” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मुली खूप भारीच असतात”