सोशल मीडियावर अनेक गमतीशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये प्राण्यांच्या व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. कधी प्राण्यांनी विनाकारण त्रास देणाऱ्यां लोकांचा पाठलाग केल्याचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. मात्र, सध्या अशा एका गाईचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कारण या व्हिडीओतील एक गाय गोठ्याला लावलेली कडी जीभेने काढताना दिसत आहे.

@TheFigen_ या ट्विटर अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या या गायीची बुद्धिमत्ता तुम्हाला आश्चर्यचकित करेल. शिवाय हा व्हिडीओ पाहून गायीचा मालक नक्कीच थक्क झाला असेल यात शंका नाही. कारण, गायीने मालकाच्या माघारी जिभेने दाराची कडी उघडून ती गोठ्यातून पळून गेली आहे. हा व्हिडिओ खूप मजेदार आहे, तो पाहून लोक म्हणत आहेत, “गरज ही शोधाची जननी आहे.”

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
water bodies, Tadoba,
ताडोबातील वाघांना आवडे नैसर्गिक पाणवठे, रखरखत्या उन्हापासून बचावासाठी….
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

हेही पाहा- Video: मासेमारी करणारा पर्यटकच झाला शिकार; माशाच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण…

व्हायरल व्हिडीओमधील गाय लोखंडी सळ्यांचा दरवाजा असलेल्या एका गोठ्यात बंद असल्याचं दिसत आहे. पण या गायीला बाहेर जाण्याची इतकी उत्सुकता लागलेली दिसत आहे की, ती आपल्या मालकांची वाट न पाहता, आपली जीभ या लोखंडी सळ्यांमधून बाहेर काढते आणि त्या दरवाजाला असणाऱ्या कडीला जीभेने उचलण्याचा प्रयत्न करते. ती सतत जीभेने कडी वरखाली करते आणि शेवटी त्या गोठ्याचे दार उघडते. दरवाजा उघडताच गाय पटकन बाहेर पडते. त्यामुळे आता मुके प्राणीही काळाबरोबर हुशार होऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांना मूर्ख समजण्याची चूक करू नका, असं नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा- Viral Video: सायकलस्वाराचा आत्मविश्वास पाहून नेटकरी झाले थक्क, म्हणाले “आयुष्यात एवढं बिनधास्त…”

गायीची आपल्या लांब जीभेचा वापर करुन दरवाज्याची कडी काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिलं आहे की, ‘माझे इंग्रजी शिक्षक नेहमी म्हणायचे; एक भाषा (जीभ) तुमच्यासाठी दरवाजे उघडते. तर आणखी एकाने लिहिलं आहे की, ‘हा माणसांचा नाही तर गायींचा ग्रह घोषित करायला हवा’. तर ‘गरज ही शोधाची जननी आहे.’ अशी कमेंट एका वापरकर्त्याने केली आहे.