scorecardresearch

Viral Video: कौशल्य, मजबुरी की जोखीम? काय प्रतिक्रिया द्याल या व्हिडीओवर

व्हायरल होत असलेल्या सायकलस्वाराचा व्हिडिओ IPS आरिफ शेख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे

Viral Video: कौशल्य, मजबुरी की जोखीम? काय प्रतिक्रिया द्याल या व्हिडीओवर
जगभरात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या अनोख्या पराक्रमाने नेटकऱ्यांना आश्चर्यचकित करत असतात. (Photo : Twitter)

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र, असे मोजकेच व्हिडीओ असतात जे नेटकऱ्यांना भावतात. सध्या अशात एका व्यक्तीचा सोशल मीडियावर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो आपलं काम ज्या आत्मविश्वासाने करत आहे, ते पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.

जगभरात असे अनेक लोक आहेत, जे आपल्या अनोख्या पराक्रमाने इतरांना आश्चर्यचकित करत असतात. ते असं काही करतात की ज्याची कल्पना आपण स्वप्नातही करू शकत नाही. अशा अनेक लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ते पाहिल्यानंतर आपल्याला डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होतं. सध्या असाच व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील एका व्यक्तीचा सायकल चालवण्याचा अनोखा अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

हेही पाहा- Video: विमानात शर्ट काढून हाणामारीवर उतरला तरुण, धिंगाणा पाहून नेटकरी म्हणतात लाज काढलीत

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत एक व्यक्ती रहदारीच्या रस्त्यावरुन सायकल चालवताना दिसत आहे. तो सायकलवरुन जात असताना त्याच्या डोक्यावर खूप सामान ठेवल्याचंही दिसत आहे. एवढं सामान डोक्यावर असतानाही ही व्यक्ती सायकलचा हँडल न पकडता, दोन्ही हातांनी डोक्यावरचं सामान पकडून भरधाव वेगाने सायकल पळवत आहे. डोक्यावर काही सामान ठेवून सायकल चालवणं हे खूप अवघड काम आहे. मात्र, हा व्यक्ती इतक्या सहजपणे सायकल चालवत आहे ते पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

हेही पाहा- Video: मासेमारी करणारा पर्यटकच झाला शिकार; माशाच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण…

व्हायरल होत असलेल्या सायकलस्वाराचा व्हिडिओ आयपीएस आरिफ शेख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जीवनात काही मिळो ना मिळो फक्त एवढा आत्मविश्वास मिळायला हवा.” हा व्हिडिओ आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओतील व्यक्तीच्या सायकल चालवण्याचा अंदाज नेटकऱ्यांना खूप आवडल्याचं दिसतं आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, ‘पोटाची भूक आणि साधनांची कमतरता आहे नाहीतर माझ्या देशात खूप प्रतिभावान लोक आहेत.’ तर आणखी एकाने “आयुष्यात एवढं बिनधास्त आणि न घाबरता राहायला जमायला हवं” अशी कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 16:00 IST

संबंधित बातम्या