Crane Bird Flying Viral Video : मैत्रीचे धागेदोरे माणसा माणसांमध्येच घट्ट बांधले जातात का? असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल. पण, आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची गरज नाहीय. कारण एका सारस पक्षाने त्या तरुणासोबत ४० किमीपर्यंतचा प्रवास करुन खरी मैत्री काय असते, याचं सुंदर उदाहरण जगासमोर आणलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या मोहम्मद आरिफला सारस पक्षी जखमी अवस्थेत सापडला होता. या सारस पक्षाचा पाय तुटल्याने तो एका शेतात पडला होता. पण मोहम्मदने त्या पक्षावर उपचार करुन त्याचा जीव वाचवला.

माणसा माणसांमध्ये वादविवाद होतात. पण काही प्राणी, पक्षी माणसांशी कधीही भांडत नाहीत. कारण संकटकाळात मदत केल्याची त्या पक्षांना जाणीव असते. अशाच एका सारस पक्षाचा व्हिडीओ व्हायरल झाला झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण मोहम्मद नावाच्या या तरुणासोबत हा सारस पक्षी दररोज ३०-४० किमीचा प्रवास करतो.

नक्की वाचा – बापरे! १५०० किलो वजनाचा साप! या नदीत आढळतात जगातील सर्वात मोठे आणि खतरनाक साप? कारण…

इथे पाहा व्हिडीओ

उत्तर प्रदेश येथील अमेठीच्या गौरीगंज परिसरातील मंडखा मजरे औरंगाबादची ही घटना आहे. मोहम्मद आरिफ आणि सारस पक्षाला जय-वीरुच्या नावाने ओळखलं जातं. गेल्या वर्षी मोहम्मदला हा सारस पक्षी जखमी अवस्थेत शेतात सापडला होता. त्यानंतर मोहम्मदने त्या पक्षाला घरी आणलं. त्याच्यावर उपचार करुन त्याला अन्नपाणी दिलं. त्यानंतर पक्षाने आकाशात भरारी घेऊन जंगलात जायलं हवं होतं. पण तसं झालं नाही. त्या पक्षाने मोहम्मदशी घट्ट मैत्री केली आणि तो त्याच्यासोबतच राहू लागला. जेव्हा मोहम्मद दुचाकीवरून जातो, त्यावेळी हा सारस पक्षी त्याच्या डोक्यावरून उडत प्रवास करतो. ३०-४० किमीचा प्रवास सारस पक्षी मोहम्मदसोबत करतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सारस पक्षाचा आणि मोहम्मदचा व्हिडीओ ट्वीटरवर व्हायरल झाला आहे. दोघांची घट्ट मैत्री पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्क बसला आहे. पाळीव प्राणी माणसांशी नाते जोडतात आणि त्यांच्यासोबत मस्ती करतात. पण एखादा पक्षी आयुष्यभरासाठी सोबती होतो, अशी घटना क्वचितच कुठे पाहायला मिळाली असले. सारस पक्षाने संपूर्ण जगाला एकप्रकारे मानवता धर्माची शिकवणच दिली आहे. मोहम्मदने आपला जीव वाचवल्याची जाणीव त्या पक्षाला झाली आणि तो त्याच्यासोबतच घरी राहू लागला. त्यांच्या या खऱ्या मैत्रीची कहाणी व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आली अन् अनेकांच्या चक्रावून गेली.