Funny Viral Video : लग्नसराईचे दिवस सुरु झाले असतानाच एका व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. भर लग्नमंडपात दारुच्या नशेत टुल्ल होऊन उड्या मारणाऱ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. पण एका पठ्ठ्याने भर मंडपात कमालच केलीय. डीजे सुरु होताच या तरुणाला कोंबड्याच्या गाण्याची झिंग चढली अन् थेट एका मुलीसमोर ठुमके मारू लागला. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाप्रमाणे व्हायरल होत आहे. तरुणाने केलेला भन्नाट डान्स पाहून नेटकऱ्यांना हसू आवरलं नाहीय. या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

लग्न सोहळ्यात आलेल्या वऱ्हाडी मंडळीचं मनोरंजन करण्यासाठी काही तरुण वेड्यासारखे डान्स करु लागतात. अशातच लग्नात पार्टी असल्यावर तर अशा तरुणांना भन्नाट डान्स करण्याची झिंगच चढलेली असते. वऱ्हाडी मंडळीच काय नवरा-नवरीही मंडपात थिरकल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण एका तरुणाने डीजेच्या तालावर केलेला कोंबडा डान्स अनेकांना पोट धरुन हसवल्याशिवाय राहणार नाही. कारण या तरुणाने जबरदस्त ठुमके लगावत साऱ्या वऱ्हाडी मंडळींच लक्ष वेधून घेतल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

नक्की वाचा – नडला त्याला वाघाने फाडला! आख्ख्या गावासमोर वाघाने शेतकऱ्यावर मारला पंजा, थरारक Video कॅमेरात झाला कैद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इथे पाहा व्हिडीओ

हा मजेशीर व्हिडीओ आशिकाली नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर इतका गाजला की, ५ मिलियनहून अधिक वेळा हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी पाहिला आहे. लाल टिशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेला एक तरुण स्टेजवर जात असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तरुणाला कोंबडा डान्स करताना पाहून स्टेजजवळ असणाऱ्या सर्वांनाच हसू आवरत नाही. भन्नाट ठुमके मारत तो एका मुलीसमोर थिरकण्याचा प्रयत्नही करताना व्हिडीओत दिसत आहे. शेजारी असलेला एक मुलगा कॅमेऱ्यात त्या तरुणाचा डान्स रेकॉर्ड करतनाच पोट धरून हसतो आहे. हा मजेशीर व्हिडीओनं लाखो नेटकऱ्यांचं मनोरंजन केलं आहे. जवळपास १५ हजारांहून अधिक जणांनी या व्हिडीओला प्रतिक्रिया दिल्या आहेत.