scorecardresearch

Video: मगरीने हरणाच्या पिल्लाला खाण्यासाठी घेतली झेप, पण आईचा त्याग बघून डोळ्यात अश्रू तरळतील

शेवटी “आई ती आईच ” तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. याची प्रचिती आपल्या प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये दिसून येते. मग तो मनुष्य असो की इतर प्राणी.

Viral_Photo
Video: मगरीने हरणाच्या पिल्लाला खाण्यासाठी घेतली झेप, पण आईचा त्याग बघून डोळ्यात अश्रू तरळतील

शेवटी “आई ती आईच ” तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही. याची प्रचिती आपल्या प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये दिसून येते. मग तो मनुष्य असो की इतर प्राणी. सोशल मीडियावर रोज कोणता कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ तर वेगाने व्हायरल होत असतात. त्यांच्या जीवनशैलीबद्दल कायमच उत्सुकता असते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या पोटच्या गोळ्यासाठी आई काय करू शकते, याचा कुणी विचारही करू शकत नाही. हरीण आपल्या जीवाची पर्वा न करता पिल्लाला वाचवण्यासाठी पुढे सरसावते. एका आयएएस अधिकाऱ्याने आईच्या प्रेमाचे जिवंत उदाहरण देत एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यात अश्रू तरळतील यात शंका नाही.

आयएएस सोनल गोयल यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आईच्या प्रेमाची ताकद, सौंदर्य आणि धैर्य कोणीही शब्दात वर्णन करू शकत नाही. आपल्या बाळाला वाचवण्यासाठी स्वतःचा बळी देताना हरणाच्या हृदयस्पर्शी व्हिडिओ. हा व्हिडीओ आम्हाला आठवण करून देतो की तुम्ही पालक आणि कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्यांचा आदर करा आणि त्यांची काळजी घ्या.” व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरणाचे पिल्लू पाण्यात पोहत आहे, तेव्हा एक मोठी मगर त्याच्या दिशेने वेगाने येऊ लागते. मगर हरणाच्या पिल्लाची शिकार करणार असल्याचे स्पष्ट होते, तेव्हाच आई मगर आणि तिच्या पिल्लाच्या मध्ये येऊन थांबते आणि पिल्लाचा जीव वाचवते. मगरी पिल्लाऐवजी आईवर हल्ला करते. अशा रीतीने हरणाचे पिल्लं वाचते पण तिच्या आईला जीव गमवावा लागतो.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. तसेच या व्हिडीओखाली आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Crocodile way to eat a deer calf but mother sacrifice rmt

ताज्या बातम्या