बाळाला झोपवण्यासाठी गिटार वाजवत गाणं म्हणणारा ‘रॉकस्टार पिता’

हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा नक्कीच हळवे झाल्याशिवाय राहणार नाही. तान्ह्या बाळासाठी ‘आई’ बनलेल्या या पित्याचा सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

dad-strums-guitar-baby-on-shoulder-viral-video
(Photo: Twitter/ GoodNewsCorrespondent)

चिमुकलं बाळ रडायला लागलं की आई अंगाई गाऊन त्याला शांत करते आणि झोपवते, असं चित्र आपण अनेक वेळा पाहतो. मात्र, रडत असलेलेल्या बाळाला झोपवण्यासाठी त्याला अलगद खांद्यावर घेऊन गिटार वाजवत गाणं म्हणणाऱ्या रॉकस्टार पित्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा नक्कीच हळवे झाल्याशिवाय राहणार नाही. तान्ह्या बाळासाठी ‘आई’ बनलेल्या या पित्याचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

बाप-लेकाच्या या क्यूट व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका खुर्चीवर बसून पित्याने आपल्या बाळाला खांद्यावर झोपवलेलं आहे. या इवल्याशा बाळाला झोप येत नव्हती म्हणून पित्याने अगदी आई अंगाई गाते त्याप्रमाणेच गिटार वाजवत गाणी म्हणायला सुरूवात केली. बाळ सुद्धा आपल्या पित्याच्या खांद्यावर झोपून शांतपणे गाणी ऐकताना दिसून येतोय. ५८ सेकंदचा हा व्हिडीओ असून पित्याचं गाणं ऐकता ऐकता बाळ सुद्धा आपले डोळे मिटवत झोपी जात असल्याचं दिसून येत आहे.

आईने अंगाई गायल्यानंतर शांत झोपी गेलेले बाळ आपण नेहमीच पाहतो. पण पित्याच्या गाण्याने झोपी जात असलेल्या बाळाचा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर एक स्माईल आल्याशिवाय राहत नाही. बाप-लेकाच्या अनोख्या प्रेमाचा हा व्हिडीओ नेटिझन्सना खूपच भावला आहे.
GoodNewsCorrespondent नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. दोन दिवसांपूर्वीच शेअर केलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत १४ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर ३५० पेक्षा जास्त लोकांनी बाप-लेकाच्या या व्हिडीओला लाईक केलं आहे. भावूक करून सोडणाऱ्या या बाप-लेकाच्या व्हिडीओवर नेटिझन्सनी कमेंट्स सेक्शनमध्ये प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. अनेक जण या व्हिडीओमधल्या रॉकस्टार पित्यांचं कौतुक करताना दिसून येत आहेत. तर अनेकांनी बाप-लेकांच्या अनोख्या बॉण्डींगवर भाष्य केलेलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना व्हिडीओ रिट्वीट करण्याचा मोह सुद्धा आवरता घेता येत नाही.

वडिलांनी आपल्या नवजात बाळासाठी गिटार वाजवण्याचा हृदयद्रावक व्हिडिओ नेटिझन्सला भावनिक बनवत आहे. पालक आणि त्यांच्या मुलांमधील बंध दर्शवणारे व्हिडिओ कधीही कुणाच्याही लक्षात येत नाहीत आणि ही अलीकडील क्लिप नक्कीच प्रत्येक दर्शकाला त्यावर क्लिक करेल. व्हिडिओमध्ये वडिलांच्या खांद्यावर आरामात झोपलेले आणि त्याला गाणे ऐकताना दिसत आहे. वडील रॉकिंग खुर्चीवर बसलेले आहेत आणि त्यांच्या मनाची संगीताची झुळूक दाखवत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dad strums guitar as he rocks baby on shoulder viral video is adorable prp

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी