konkan nagar govinda pathak 10 thar video: मुंबईसह ठाण्यात दहीहंडी उत्सवा मोठ्या थाट्यामाट्यात सुरु आहे. मुंबई आणि ठाण्यातील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथक शर्थीचे प्रयत्न करत आहे. जय जवान यंदा तरी १० थर लावणार का याकडे लक्ष असताना कोकण नगर गोविंदा पथकाने १० थर रचून विश्वविक्रम केला आहे. हा थरार अनुभव ठाण्यातील प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी सोहळ्यात पाहिला मिळाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.
जय जवान गोविंदा पथकाने २०१२ मध्ये ठाण्यात प्रथमच नऊ थर रचून विक्रम केला होता. त्यानंतर या पथकाने त्याचवर्षी ऑक्टोबरमध्ये स्पेनमधील पथकाच्या विक्रमाची बरोबरी केली होती. त्यानंतर या पथकाने साडे नऊ थर रचून आपलाच विक्रम मोडीत काढला. यंदा हे गाेविंदा पथक आपला विक्रम पुन्हा मोडीत काढण्याच्या तयारीत होते मात्र त्याआधीच जोगेश्वरीतील कोकण नगर गोविंदा पथकानं १० थर लावत विश्व विक्रम केला आहे.कोकणनगर गोविंदा पथकाने वर्तकनगर येथील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात दहा थर लावून विश्वविक्रम केला. या विक्रमानंतर मंत्री सरनाईक यांनी मंडळाला २५ लाखांचे पारितोषिक जाहीर करताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जयघोष सुरू केला.दरवर्षी प्रमाणे यावर्षीही संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे वर्तकनगर येथील मैदानात दहीहंडी उत्सव उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. या मंडळांकडून दरवर्षी प्रमाणे लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
पाहा व्हिडीओ
अंधेरी (पूर्व) येथील मालपा डोंगरी, त्याचबरोबर सांताक्रुझमधील विघ्नहर्ता, बोरिवलीतील शिवसाई गोविंदा पथक नऊ थर रचण्यात आघाडीवर आहेत. त्याचबरोबर वडाळा येथील यश गोविंदा पथक, अष्टविनायक गोविंदा पथकही लिलया नऊ थर रचत आहेत. तसेच गतवर्षी आठ थर रचणारे हिंदमाता गोविंदा पथक नऊ थरांचा प्रयत्न करणार आहे.
सरनाईक काय म्हणाले…
मी पारितोषिक आधीच जाहीर केले होते. कोकण नगर मनापासून अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने त्यांनी राष्ट्रभक्ती दाखवली, कोणी कितीही काही म्हणून द्या, तुम्ही मराठी एकी दाखवली. मी या पथकाला २५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करतो.