Viral Video : वडील मुलीचं नातं हे जगावेगळं असतं. या नात्यात प्रेम, काळजी, जिव्हाळा आणि आपुलकी दिसून येते. असं म्हणतात, वडीलांचा मुलीवर खूप जास्त जीव असतो. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हिरो असतात कारण ते तिच्या आनंदासाठी वाट्टेल ते करतात. सोशल मीडियावर बापलेकीचे प्रेम दर्शवणारे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका चिमुकलीने तिच्या वडिलांसाठी पहिल्यांदा पिठलं भाकरी केली आहे. व्हिडीओ पाहून तु्म्हीही थक्क व्हाल. काही लोकांना त्यांच्या वडिलांची आठवण येईल तर काही लोकांना त्यांच्या मुलीची आठवण येईल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक चिमुकली झाडाखाली बसलेल्या आणि लॅपटॉप हातात घेऊन काम करणाऱ्या वडिलांजवळ जाते आणि त्यांना विचारते, “काय खाणार, तेव्हा वडील म्हणतात, “पिठलं भाकरी” त्यानंतर ही चिमुकली पिठलं भाकरी बनवताना दिसते. तिने स्वत:चे किचन तयार केले आहे.त्यानंतर ती दगडांपासून चूल बनवते आणि काठीच्या मदतीने चूल पेटवते आणि त्यावर पिठलं आणि भाकरी तयार करते. अगदी लहान भाड्यांचा वापर करत ती अप्रतिम पिठलं आणि भाकरी बनवते आणि त्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये भाकरी आणि पिठलं सर्व्ह करते आणि वडीलांनाजवळ जाते वडिलांच्या हातात ही प्लेट देते. वडील जेव्हा पिठलं भाकरी खातात, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा असतो. वडील सुद्धा मुलीला पिठलं भाकरी भरवताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हेही वाचा : Onion Flower Fritters : कांद्याच्या पातीची भजी कधी खाल्ली आहेत का? नसेल तर नक्की करून पाहा ही रेसिपी

manishajamdare या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बाबांसाठी पहिल्यांदा पिठलं भाकरी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हरवलं हे सगळं सुद्धा आयुष्यातून” तर एका युजरने लिहिलेय, “तुम्ही खूप भाग्यवान आहात दोघे तुम्हाला श्रीजा सारखी गोड मुलगी देवाने दिली. आधी वाटले भातुकलीच्या खेळातील काही खोट खोट खायला देईल पण तिने चक्क खरोखर पिठलं भाकरी केली. व्वा इतका छान व्हिडीओ तुम्हीच सादर करू शकता याचे श्रेय तुम्हा दोघांना जाते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “माझे शब्द संपलेत हा सुंदर व्हिडीओ पाहून. इतकं छान नातं बाबा आणि मुलीचं इतक्या छान पद्धतीने दाखवलं आहे की अक्षरश: डोळे भरून आले माझे.”