केंद्र सरकारने सतत आवाहन करुनही अद्याप २० टक्के नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र शासनाकडून ३१ मार्च २०२३ ही आधार-पॅन लिंक करायची अंतिम तारीख देण्यात आली होती. ही मुदत संपायला तीन दिवस शिल्लक असतानाच आज पुन्हा आधार-पॅन लिंक करायची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप आधार-पॅन लिंक करायचे आहे त्यांना दिलासा मिळाला आहे.

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत शासनाकडून पुन्हा वाढवण्यात आली आहे. हे काम करण्यासाठी ३१ मार्च २०२३ ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र आता ती पुन्हा तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२३ असणार आहे. अर्थ मंत्रालयाकडून आधारशी पॅन लिंक करण्याची तारीख वाढवण्याच्या निर्णयानंतर स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, जर ३० जून २०२३ पर्यंत कार्ड लिंक केलं नाही तर त्यानंतर तुमचे कार्ड निष्क्रिय केलं जाईल आणि त्यानंतर तुमच्या पॅनचा काहीही उपयोग होणार नाही.

tax fraud case
१७५ कोटींचे कर फसणूक प्रकरण : विक्रीकर अधिकारी व १६ जणांवर गुन्हा दाखल, एसीबीची कारवाई
caa in assam,
सीएए विरोधात आसाममधील विरोधीपक्ष आक्रमक, मुख्यमंत्री सरमांनीही दिलं प्रत्युत्तर; पुन्हा आंदोलन पेटणार?
Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार
Manoj Jarange Patil assured the High Court that the agitation will be carried out in peaceful way
आंदोलन सर्वतोपरी शांततापूर्ण मार्गाने करणार, मनोज जरांगेंची उच्च न्यायालयात हमी

प्राप्तिकर विभागाने दिली माहिती –

कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवल्याची माहिती प्राप्तिकर विभागाने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. ट्विटमध्ये म्हटलं आहे की, या महत्त्वाच्या कामासाठी करदात्यांना आणखी थोडा वेळ देण्यात आला आहे. त्यानुसार ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. करदात्यांना आधी दिलेली अंतिम मुदत संपण्याच्या तीन दिवस आधी हा दिलासा देण्यात आला आहे. सध्याच्या काळात पॅन कार्ड हे सर्वात महत्‍त्‍वाचे दस्ताऐवज बनले आहे, जे तुमच्‍या आर्थिक कामासाठी खूप महत्‍त्‍वाचे आहे.

बंद कार्डचा वापर महागात पडणार –

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यावर, तुम्ही कोणत्याही आर्थिक कामासाठी त्याचा वापर केल्यास तुम्हाला १० हजारांपर्यंत दंड होऊ शकतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 272B अन्वये ही दंडाची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय ३० जून २०२३ पर्यंत तुम्ही १०० रुपये दंड भरून तुमचे पॅन आधारशी लिंक करू शकता.

हेही वाचा- AI च्या मदतीने ११ वर्षांच्या भारतीय मुलीने तयार केले Eye disease detection app; नेटिझन्स म्हणाले…

ऑनलाइन पद्धतीने आधार-पॅन लिंक कसे करावे?

आधार-पॅन लिंकिंग करण्याआधी इनकम टॅक्स विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जावे. तेथे व्यवस्थितपणे योग्य माहिती भरावी आणि लॉग इन करावे. जर असे करणे शक्य होत नसेल, तर पॅन नंबरच्या मदतीने नवीन अकाउंट तयार करावे. लॉन-इन करताना यूजर आयडीमध्ये पॅन नंबरचा वापर करावा. अशाच प्रकारे आधार कार्डसाठीच्या utiitsl.com / egov-nsdl.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही अकाउंट लिंक करणे शक्य आहे.

अशी तपासा पॅन कार्डची वैधता –

  • पॅन कार्डची वैधता तपासण्यासाठी ‘हे’ करा
  • प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटला भेट द्या.
  • होमपेजवर Tax e-Services हे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • खाली स्क्रोल करा. PAN subcategory च्याखाली ‘Know your PAN’ हे ऑप्शन दिसेल.
  • त्याच्या बाजूला असलेल्या रकान्यातील बाणांवर टॅप करा.
  • त्यानंतर पोर्टलवरील ई-फायलिंग लिंकवर क्लिक करा.
  • पुढील पेजवर जाण्यासाठी तेथे आवश्यक तपशील भरा.
  • तपशील भरल्यानंतर त्याची पडताळणी केली जाईल. त्यात पॅन कार्डच्या स्थितीबाबतची माहिती दिसेल.