भारतात मांसाहारी आणि शाकाहारी खाणाऱ्या लोकांची संख्या खूप आहे. कारण शाकाहारी हे आरोग्यासाठी फायदेशीर, तर मांसाहारी हा खवय्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. पण, तसं बघायला गेलं तर आठवड्यातून दोन दिवस मांसाहारी तर बाकीचे उर्वरित दिवस हे शाकाहारी जेवणाचे सेवन केले जाते. तसेच जेव्हा कधी ऑनलाइन ऑर्डर करण्याची वेळ येते, तेव्हा या शाकाहारी खवय्यांसाठी हॉटेल शोधण्यात बराच वेळ जातो. पण, आता व्हेज खाणाऱ्या ग्राहकांना चिंता करण्याची गरज नाही. कारण झोमॅटोने शाकाहारी खाणाऱ्या ग्राहकांसाठी ‘प्युअर व्हेज मोड’ लाँच केला आहे. तर झोमॅटोच्या नवीन सेवेबद्दल या लेखातून अधिक जाणून घेऊ.

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी झोमॅटोच्या नवीन फीचरविषयी माहिती शेअर केली. त्यांनी ट्विट केले की, शाकाहारी पदार्थ खाणाऱ्या अनेक ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांचा विचार करता हे खास फीचर सुरू केले आहे. तसेच खास गोष्ट अशी की, ‘प्युअर व्हेज मोड’ केवळ शुद्ध शाकाहारी जेवण देणाऱ्या रेस्टॉरंटची यादी ग्राहकांना मोबाइलवर सुचवेल. याव्यतिरिक्त ‘प्युअर व्हेज मोड’द्वारे दिल्या जाणाऱ्या ऑर्डर झोमॅटोच्या ‘प्युअर व्हेज फ्लीट’द्वारे डिलिव्हर केल्या जातील; ज्यामध्ये हिरव्या रंगाच्या डिलिव्हरी बॉक्सचा समावेश असेल.

Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
Barfiwala bridge
मुंबई : बर्फीवाला पुलाचा ‘पार्किंग’साठी वापर, क्रिकेट खेळण्यासाठी, कपडे वाळत घालण्यासाठी उपयोग
millions of old vehicles running on pune road no re registration after fifteen years
पुण्यातील रस्त्यावर लाखभर जुनी वाहने! पंधरा वर्षे होऊनही पुनर्नोंदणी नाही

हेही वाचा…७५ शेफनी बनविला जगातील सर्वांत मोठा डोसा! १०० वेळा ठरले अयशस्वी; पण…. पाहा VIDEO

पोस्ट नक्की बघा :

तुम्ही पाहिलं असेल की, झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी ग्राहकांना शाकाहारी पदार्थ डिलिव्हर करणाऱ्या प्युअर व्हेज फ्लीटमधील डिलिव्हरी बॉयचे काही फोटोही शेअर केले आहेत; यामध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय यांनी हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहेत. तसेच यांच्या डिलिव्हरी बॉक्सचा रंगसुद्धा हिरवा आहे.

झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी आज १९ मार्च रोजी ‘प्युअर व्हेज फ्लीट’सह ‘शाकाहारी खाणाऱ्या ग्राहकांसाठी ‘प्युअर व्हेज मोड’ लाँच केला आहे. हे फीचर संपूर्ण भारतात टप्प्याटप्प्याने आणले जाईल. सोशल मीडियावर व्हेजप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी त्यांच्या @deepigoyal या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केली आहे. तसेच अनेक ग्राहक हे खास फीचर पाहून आनंद व्यक्त करताना व त्यांचे यापूर्वीचे अनुभव कमेंटमध्ये सांगताना दिसत आहेत.