Tiger vs Deer Viral Video : तुम्ही आजपर्यंत शिकाऱ्याला शिकारीच्या पाठीमागे जाताना पाहिलं असेल. पण नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत शिकार स्वत:च शिकाऱ्याच्या समोर आलेलं पाहायला मिळालं आहे. वाघ, सिंह, बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्यांना पाहून हरणासारखे चपळ प्राणी धूम ठोकतात. पण यावेळी काहीसं उलट घडलं आहे. एक हरण वाघाच्या नजरेला नजर देत चक्क त्याच्यासमोर उभा राहतो. शिकारीसाठी काटकोनात टक लावून बसलेल्या वाघाला तर आयतं कोळीतच मिळतं. पण हरणाची नजर जेव्हा वाघाशी भिडते, तेव्हा जे घडतं ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

एक वाघ रस्त्याच्या मधोमध शिकारीची वाट पाहत बसलेला असतो. याचदरम्यान त्याच्यासमोर हरण येतो. हरणाला वाघ दिसताच त्याच्या अंगावर शहारा येतो. वाघ हळूहळू हरणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. वाघाला हरणाच्या दिशेनं जाताना पाहून तु्म्हाला नक्की वाटलं असेल की, आता हरणाचा गेम होणार? पण वाघ हरणाच्या जवळून निघून जात असल्याचं या व्हिडीओ तुम्ही पाहू शकता. हरणावर कोणत्याही प्रकारचा हल्ला न करता, वाघ तिथून निघून गेल्याचं या व्हिडीओता पाहायला मिळत आहे. पुढे काय झालं, हे व्हिडीओत पाहायला मिळत नाही. कारण काही सेकंदांनंतर व्हिडीओ क्पिल संपते.

Using Plastic Chopping Board Can Harm Stomach Throw These Four Items From Kitchen
Earth Day: तुमच्या किचनमधून आजच बाहेर काढा ‘या’ ४ वस्तू; पर्यावरणच नव्हे तर पोटाच्याही ठरतात शत्रू
Tigress chilling in a jungle stream on a hot summer
Viral Video : हाय गर्मी! उन्हाचा तडाखा सहन झाला नाही म्हणून वाघीन अशा ठिकाणी जाऊन बसली की तुम्ही…
a Man falls down from e rickshaw while dance atop vehicle
Video : चालत्या ई – रिक्षाच्या छतावर डान्स करत होता तरुण, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; पाहा, व्हायरल व्हिडीओ
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा

नक्की वाचा – कोळ्याकडे होती अक्कल पण माणसाने लढवली शक्कल, कानात जाळं पसरवल्यानंतरही कोळी का पळाला? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

वाघाचा आणि हरणाचा व्हिडीओ IFS अधिकारी रमेश पांडे यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर शेअर केला आहे. २० सेकंदांच्या या व्हिडीओला शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलंय, “हा वाघ एक मॉंक आहे. तो तुम्हाला त्रास देणार नाही किंवा तुमचा त्याला काही त्रास जाणवणार नाही. जितकं शक्य असेल तितका तो शांत राहण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही त्याच्या जवळ असाल, तेव्हाही तो शांत राहण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा त्याला राग येतो, तो फक्त एक दिखावा असतो.” या व्हिडीओला आतापर्यंत २९.५ के व्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.