Pre-wedding shoot goes wrong in Rishikesh: प्री-वेडिंग फोटोशूट सध्या जगभरात ट्रेन्डिंगवर आहे. आपल्या होणाऱ्या जोडीदारासोबत चांगले फोटो काढण्यासाठी, आयुष्यभर लक्षात राहतील अशा आठवणी आपल्या गाठिशी राहाव्यात यासाठी वेगवेगळे जोडपे वेगवेगळ्या युक्त्या काढत आपली प्री-वेडिंग फोटोशूट प्लान करतात. सध्याच्या तरुणाईला ‘प्री- वेडिंग’चे वेड लागले आहे. लग्नाआधीच्या या ‘शूट’मध्ये नव वधू- वरासाठी फिल्मी दुनिया वास्तवात उतरवण्याचा रोमँटिक ट्रेड सुरू आहे. हे प्री वेडिंग फोटोशूट केल्याशिवाय जणू लग्नच पूर्ण होत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. असंच एक अजब-गजब प्री-वेडिंग फोटोशूट करणारं एक जोडपं सध्या अनेकांच्या चर्चेचा विषय ठरतंय. ज्यामध्ये एक जोडपे प्री-वेडिंग शूट करत असताना गंगा नदीच्या मध्यभागी अडकल्याचे दिसून येते. प्री-वेडिंग शूट या जोडप्याच्या चांगलच जीवावर बेतलं आहे.

सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू झाली आहे. त्यामध्येच प्री वेडींग फोटोशूट हा विषय सध्या चर्चेत आहे. आपलेही सेलिब्रिटींप्रमाणे फोटोशूट व्हावे अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते, ही इच्छा लग्नसमारंभामध्ये पूर्ण केली जाते. त्यातही प्री वेडिंग फोटोशूट हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून ट्रेंडमध्ये आहे. यामध्ये लग्नाच्या काही दिवस आधी वेगवेगळ्या थीम ठरवून शूट केले जाते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक जोडपे ऋषिकेशच्या नदीत रिव्हर राफ्टींगदरम्यान फोटोशूट करत होते. मात्र त्यांच हे फोटोशूट चांगलंच फसलं. हे जोडपं नदीच्या मध्येच अडकलं आणि पाण्याचा प्रवाह वाढायला लागला.

आजूबाजूच्या लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना देताच, एसडीआरएफने गंगा नदीच्या मध्यभागी अडकलेल्या जोडप्याची सुटका केली. याआधीही अशा अनेक घटना व्हायरल झाल्या आहेत ज्यात जोडपे लग्नाआधीच्या वेळी काही आपत्तीला बळी पडतात. तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलने व्हिडिओ शूट केला. यादरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नसून दाम्पत्य सुखरूप बचावले असल्याचे सांगण्यात येत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दुश्मन ना करे दोस्त ने वो…मोठ्या मगरीनं छोट्या मगरीचा फडशा पाडला; VIDEO एकदा पाहाच

editorji नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत १.३ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला जवळपास ११ हजार लोकांनी लाईक देखील केले आहे. लोक त्यावर कमेंट करताना दिसत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले… ते लाईफ जॅकेट का फेकू शकत नाहीत? दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…हे प्री-डेथ शूट आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… हे लोक कोण आहेत, ते कुठून आले आहेत?