scorecardresearch

Premium

तब्बल तीन दिवस ड्रेनेजमध्ये अडकला होता कुत्रा, अग्निशमन दलाने काढले पाहिले, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा Viral Video

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, दिल्ली फायर सर्व्हिसच्या नायकांनी ३ दिवसांपासून गटारात अडकलेल्या एका कुत्र्याला वाचवले आहे.

delhi fire service officials
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, दिल्ली फायर सर्व्हिसच्या नायकांनी ३ दिवसांपासून गटारात अडकलेल्या एका कुत्र्याला वाचवले आहे. (फोटो सौजन्य – इंस्टाग्रामsimexposure )

एक भटक्या कुत्र्याला तीन दिवसांपेक्षा जास्त काळासाठी गटारामध्ये एक कुत्रे अडकले होतो. या कुत्र्याला गटारातून दिल्लीच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले आहे. दिल्लीमध्ये ग्रीन पार्कमध्ये ही घडना घडली. रस्त्यावर कुत्र्याचा रडण्याचा आवाज ऐकल्यानंतर लोकांनी अग्निशामक दलाला कळवले. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी बचाव मोहिम सुरू केली. बचाव मोहिमेचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओनुसार, तुटलेल्या चेंबरमधून कुत्रा गटारात पडल्यानंतर बाहेर पडू शकला नाही. त्यानंतर, कुत्र्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी रस्त्यावर ड्रिल केले. एका मिनिटाच्या व्हिडीओनुसार, अधिकाऱ्यांनी रस्ता तोडण्यासाठी अनेक उपकरणे वापरली आणि नंतर रस्त्यातील दगड हाताने काढले. काही मिनिटांनंतर त्यांना कुत्र्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर अग्निसुरक्षा अधिकाऱ्याने कुत्र्याला बाहेर काढले आणि खाण्यापिण्यास दिले.

KL Rahul IPL 2024 Shoot Video Viral
VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला
Alexei Navalny Death
अलेक्सी नवाल्नींची शक्ती अन् प्रेरणास्थान राहिलीय ‘युलिया; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली पोस्ट चर्चेत
Delhi Salon firing shot dead २
दिल्लीतल्या सलूनमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, दोघांची हत्या, CCTV VIDEO व्हायरल
A woman saree stuck in the wheel of a two-wheeler a cleaning worker help them Uncle's humanity won everyone's heart Viral Video
दुचाकीच्या चाकात अडकला महिलेचा पदर, सफाई कर्मचाऱ्याने केली मदत; काकांच्या माणुसकीने जिंकले सर्वांचे मन!

हेही वाचा – डॉ. अक्षता कृष्णमुर्ती ठरली मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय नागरिक; जाणून घ्या तिचा प्रेदणादायी प्रवास


हेही वाचा – “सॉफ्टवेअर जॉब सोडा आणि चांदणी चौकात लेहेंगा विका” तरुणाच्या पोस्टवरून सोशल मीडियावर पेटला नवा वाद

लोकांनी केले अग्निशामक दलाचे कौतूक
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, दिल्ली फायर सर्व्हिसच्या नायकांनी ३ दिवसांपासून गटारात अडकलेल्या एका कुत्र्याला वाचवले आहे. एका आठवड्यापूर्वी शेअर केलेल्या या व्हिडीओला एक लाखांपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे तर तीन मिलियन पेक्षा जास्त लोकांनी पाहिजे आहे. एकाने लिहिले की, हे खरे हिरो आहेत , देव त्यांना आशिर्वाद देवो.” दुसऱ्याने लिहले, “सलाम” तिसऱ्याने लिहिले,” ही गोष्ट शेअर केल्याबद्दल धन्यवाद! मोटू हा माझा सार्वजनिक कुत्रा आहे आणि त्याला मी, माझे कुटुंब आणि मनोज भैया (भाजीविक्रेता) खायला देतो, आम्ही त्याच्या मित्रांची (माईटी आणि जॅकी) यांचीही काळजी घेतो. मोटू आता बरा आहे आणि काही दिवस निरिक्षणात आहे कारण तो म्हातारा कुत्रा आहे. मोटूला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Delhi fire service officials rescue dog stuck in drain for 3 days watch video

First published on: 05-12-2023 at 12:49 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×