Viral Post :- सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत असतात; ज्यात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण त्यांचे डान्सचे कौशल्य दाखवताना दिसतात. या सगळ्या गोष्टी बघता (DMRC) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या ट्विटरवर अकाउंटवरून एक पोस्ट व्हायरल होत आहे, जी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे, ज्यात ॲव्हेंजर चित्रपटातील प्रसिद्ध भांडणाच्या सीनचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या ॲव्हेंजर चित्रपटातील सीनचा संबंध, दिल्ली मेट्रोत घडणाऱ्या घटनांशी जोडून एक खास मिम तयार करण्यात आला आहे. चित्रपटातील प्रसिद्ध सीनच्या फोटोसोबत काही वाक्य जोडली गेली आहेत, ती अशी की… मी डान्सर आहे. कुठे डान्स करतोस? दिल्ली मेट्रोत रिल बनवतो, असा एक गमतीशीर मिम तयार करून “दिल्ली मेट्रोत प्रवास करा, दंगा नाही” असे कॅप्शन लिहून हा मिम शेअर करण्यात आला आहे. या प्रसिद्ध मिमच्या मदतीने हा संदेश दिल्लीतील प्रवाशांपर्यंत पोहचवला आहे असं म्हणायला हरकत नाही.
हेही वाचा :- जुगाडू काकांनी पावसाळ्यात शोधली श्रीमंत व्हायची युक्ती! ग्राहकांनीही घेतलं डोक्यावर, पण मग टीका का होतेय?
नक्की बघा पोस्ट :-
अश्लील चाळे करणारे, व्हिडीओ बनवणारे, क्षुल्लक कारणांवरून भांडणं करणाऱ्या अनेक जणांमुळे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना नेहमीच त्रास होतो. म्हणूनच दिल्ली मेट्रोत रिल आणि डान्स व्हिडीओ बनवण्यापासून सगळ्यांनाच सावध करण्यासाठी ही पोस्ट दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्याद्वारे शेअर करण्यात आली आहे; जी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. अनेक नेटकरी या पोस्टवर विविध कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांना हा मिम बघून हसू आवरत नाही, तर यातील एका व्यक्तीचं असं म्हणणं आहे की, अश्या लोकांवर मिम बनवून फायदा नाही, यांच्यावर योग्य ती कारवाई केली पाहिजे.