Viral video: आजचं जग हे ऑनलाईन आहे. आजकाल ऑनलाइन शॉपिंगचं प्रचंड फॅड आहे. लोकं उठता बसता आपल्याला हवं ते सगळंच ऑनलाइन मागवतात. ऑनलाइन शॉपिंग लोकांना सगळ्यात सोपी वाटते. पैसे ऑनलाइन ट्रान्स्फर करायचे आणि ऑर्डर लगेच ४-५ दिवसात घर पोहोच! या फॅडमुळे लोकांना दुकानात जाऊन शॉपिंग करायचा कंटाळा यायला लागलाय. दुकानात ज्या गोष्टी मिळतात त्याच लोकांना ऑनलाइन मिळतात. पण कुठलाही बिझनेस वाढायला लागला की त्यासोबत फसवणूक सुद्धा हळू हळू व्हायला लागते.

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांचे असतात. अनेकदा या व्हिडीओंमध्ये हे डिलिव्हरी बॉय जेवण्यास वेळ नसल्याने रस्त्यात कुठेतरी आसरा घेत जेवताना दिसतात. काही कंपन्या मोजक्या वेळेत ऑर्डर पोहोचवण्याचं आश्वासन देत असल्याने त्यांच्यावर नेटकरी यानिमित्ताने टीका करतात. दरम्यान, यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो खूपच धक्कादायक आहे.

farmer suicide, documentry farmer suicide
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: अचंबित करणाऱ्या गोष्टी…
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पार्सल डिलिव्हरी करणारा व्यक्ती येतो आणि लांबूनच ते पार्सल दरवाजात फेकतो. त्यानंतर त्याचा फोटो काढतो आणि पुन्हा ते पार्सल उचलून घेऊन जातो. त्याने ते पार्सल पत्त्यावर पोहोचं केल्याचं दाखवण्यासाठी फोटो काढला होता आणि त्याचा त्याच्याकडे पुरावाही ठेवला. पण हा फोटो काढल्यानंतर त्याने स्वतःच हे पार्सल इथून उचलून गायब केलं होतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “मला आता नरेंद्र मोदींना चहा पाजायचाय” बिल गेट्स यांना चहा देणाऱ्या डॉलीचा नवा VIDEO व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला खूप व्ह्यूज मिळाले आहेत. यावर लोक प्रतिक्रियाही देत आहेत. एकाने लिहिले की, ‘ऑनलाईन शॉपिंग आता स्कॅम गुरू झाला आहे. तर काहींनी सांगितले की, ऑनलाइन शॉपिंग नेहमीच महाग असते.

ऑनलाइन फसवणूक झाली तर काय कराल ?

तुमची सुद्धा कधी ऑनलाइन फसवणूक झाली तर सुरुवातीला ज्या कंपनीकडून ती वस्तू मागविली, त्या कंपनीकडे आणि रिटेलरकडे तक्रार करावी. तसेच त्या वस्तूचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात तसेच सायबर सेलकडे तो व्हिडीओ सादर करून तक्रार दाखल करावी.सणासुदीच्या काळात विविध ऑफरचे आमिष दाखवत सायबर ठग फसवणूक करत आहेत. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. अधिकृत संकेतस्थळावरूनच व्यवहार करा.

मग तुमचं मत काय आहे? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटत आहे?