वय हा फक्त एक आकडा आहे. आपले छंद, आपली पॅशन जोपासण्यासाठी वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. पण हे करून दाखवलंय साठी पार केलेल्या या आजीबाईने…तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर ही आजीबाई एकदा तरी तुमच्या नजरेस पडली असेल. ‘डान्सिंग दादी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आजीबाईचा नवा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये आजीबाईने चक्क ‘नवराई माझी लाडाची’ या गाण्यावर जबरदस्त ठुमके लावले आहेत. डान्स करताना या आजीबाईच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदी नव्या नवरीलाही लाजवेल असेच आहेत. हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

आपल्या आवडीनिवडी जपण्यासाठी वयाची मर्यादा नसते. मनात इच्छाशक्ती असेल तर आपण कोणतेही काम करु शकतो. सध्या हीच गोष्ट या साठी पार केलेल्या आजीने शक्य करुन दाखवलंय. एवढं वय असणाऱ्या इतर लोकांना नीट जागचं हालताही येत नाही. पण या आजी चक्क या मुळ गाण्यातल्या श्रीदेवीला सुद्धा मागे टाकेल असा तुफान डान्स केलाय. नव्या नवरीच्या चेहऱ्यावरील लाली फुलते अगदी त्याचप्रमाणे या आजीबाईंच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्या डान्समध्ये दिसत आहे. ‘नवराई माझी लाडाची’ या गाण्यावरील आजीचा हा डान्स व्हिडीओ अनेकांना सुखावणारा आणि निखळ आनंद देणारा ठरतोय.

या आजीला सोशल मीडियावर ‘डान्सिंग दादी’ या नावाने ओळखत असून त्यांचं नाव रवी बाला शर्मा आहे. त्या सोशल मीडियावर सक्रिय असतात. वयाने साठी पार केलेली असली तरी या आजी अतिशय सुंदर डान्स करतात. या आजीबाईंचा हा हटके डान्स पाहून अनेकजण चकित झाले आहेत. रवी बाला यांचे इन्स्टाग्रामवर १ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या डान्सिंग टॅलेंटमुळं या आजी सोशल मीडियावर रातोरात स्टार बनल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या या आजीबाईंचा ‘नवराई माझी लाडाची’ या गाण्यावरचा डान्स प्रचंड व्हायरल होतोय. अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी या आजीची तुलना श्रीदेवीशी केली आहे. आजीच्या या व्हिडिओला आतापर्यंत १३ हजाराहून अधिक लोकांनी पाहिलं तर तर अनेकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. निखळ मनानं डान्स करणाऱ्या या आजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.