Desi Jugaad Video: जुगाड ही कोणत्याही नव्या शोधाची सुरुवात असते असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. आपल्याकडे प्रत्येक छोटया- मोठ्या समस्या सोडविण्यासाठी अफलातून जुगाड केले जातात. आतापर्यंत तुम्ही अनेक जुगाड पाहिले असतील पण सध्या सोशल मीडियायावर व्हायरल होत असलेला एक जुगाड पाहून तुम्ही अक्षरश: डोक्यावर हात मारून घ्याल. या व्हिडिओमध्ये जुगाड करून चक्क १० जण एका बाईकवर बसले आहेत. चला जाणून घेऊ या त्यांचा अतरंगी जुगाड काय आहे.

एका बाईकवर बसवले चक्क १० जण

तुम्ही अनेकदा आई-वडिलांसोबत एक किंवा दोन मुले बाईकवर बसून बाईक चालवताना पाहिली असतील. पण व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एक-दोन नव्हे तर नऊ मुलांना आपल्यासोबत बसवले आहे. यासाठी या व्यक्तीने असा देशी जुगाड वापरला आहे की जो पाहून तुम्ही थक्क व्हाल.

Riding scooter without helmet
ट्रॅफिक पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी तुम्ही ‘असा’ अतरंगी जुगाड कधी केलात का? व्हायरल व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल
Is Beetroot Really Vegetable Viagra How Eating Beet Helps For Sex Drive
बीट हे भाजीच्या रूपातील Viagra आहे का? सेक्स लाइफशिवाय बीट खाल्ल्याने काय फायदा होऊ शकतो?
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर

हेही वाचा : लडाखमधील अप्रतिम फुटबॉल स्टेडियम पाहिले का? आनंद महिंद्रांनी शेअर केलेले मनमोहक फोटो पाहून तुम्हीही व्हाल मंत्रमुग्ध!

असा केला जुगाड

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती 9 मुलांना बाईकवर बसविण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यक्तीने त्याच्या पुढे पॅट्रोलच्या टाकीवर, हँडलपर्यंत ४ मुलांना बसवले आहे. एवढेच नव्हे तर पुढच्या चाकावरही एक मुलगी उलटी बसल्याचे दिसते आहे. गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मागच्या बाजूला ३ मुली बसल्या आहेत. तरीही एक व्यक्तीसाठी जागा त्यांना कमी पडते. मग काय मागच्या बाजूच्या ३ मुली उतरतात एक फळी गाडी चालवणाऱ्याच्या खाली सीटवर ठेवतात जी गाडीच्या मागे जास्त जागा तयार करते. मग चारही मुली त्या फळीवर बसताना दिसत आहे. हा जुगाडचा पाहून तुम्हीही म्हणाल की, ”हे फक्त भारतातच घडू शकते.”

हेही वाचा : आजपर्यंत शेवटचे असलेले उत्तराखंडमधील माणा गाव आता झाले पहिले, कसं ते जाणून घ्या

देसी जुगाड सोशल मीडियावर चर्चेत

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा ट्रेंडिंग व्हिडीओ इन्स्टाग्रामवर jass__u.s.a नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला आणि शेअर केला जात आहे. गेल्या आठवड्यात शेअर केलेल्या या देसी जुगाड व्हिडिओला 2 लाख 32 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

जीवावर बेतेल असा जुगाड करू नका

हा व्हिडिओ कितीही पाहिला जात असला तरी तुम्ही चुकनही असा जुगाड करण्याचा प्रयत्न करू नका. जुगाड करून आपल्या गरजा पूर्ण करणे ठिक आहे पण कोणाच्याही जीवावर बेतेल असा जुगाड टाळावा. बरोबर ना?

तुम्हाला काय वाटते? आम्हाला नक्की कळवा