Viral video: लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका जावा-जावांचा कार्यक्रमात जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर व्हिडीओची कमी नाही. लोक वेगवेगळे व्हिडीओ इथे शेअर करत असतात. जे डान्स किंवा एखाद्या टॅलेंटशी संबंधीत असतात. शिवाय माहिती देणारे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या असा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही घायाळ व्हाल.

सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, अशाच काही गृहिणींच्या डान्स व्हिडीओची संपूर्ण सोशल मीडियावर चर्चा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात काही आनंदाचे, मौजमजेचे क्षण घालवण्याची इच्छा प्रत्येकाची असते, मग ती स्त्री असो वा पुरुष. पण महिलांच्या बाबतीत अशाप्रकारे स्वत:साठी वेळ काढणं फार कठीण असतं. कारण कुटुंब, करिअर आणि सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. अशातच या महिलांनी स्वत:ला जे आवडत ते करण्यासाठी दिवसातून वेळ काढायचं ठरवलं आणि आपला छंद जपला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या दोघींनीहीहृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे… या मराठी गाण्यावर डान्स करत आहेत. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हल्ली मराठी गाण्यांवर फारसं कुणी डान्स करताना दिसत नाही, मात्र या महिलांनी मराठी गाण्यावर असा डान्स केला आहे की, पाहून तुम्हीही थिरकायला लागाल.त्यां

पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

हा डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांना इतका आवडला आहे की,अनेक प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,”अभिनंदन दिदी एकदम छान आहे व्हिडिओ दोघांचं” तर दुसऱ्या यूजरने कमेंटमध्ये लिहिले,”खूप मस्त जोडी, असेच रहा शेवट पर्यंत भांडण करू नका दोघींचा पण सुपर डान्स” शिवाय अशा अनेक कौतुकास्पद प्रतिक्रिया आल्या आहेत.