उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्यामुळे ‘बीसीसीआय’कडून पृथ्वी शॉवर आठ महिन्यांच्या बंदीची कारवाई करण्यात आली आहे. १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत पृथ्वीला क्रिकेटपासून दूर राहावं लागणार आहे. या निर्णयानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. लोकप्रिय क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी भारतीय क्रिकेटची धूरा सांभाळणाऱ्यांना पृथ्वी शॉला काळजीपूर्वक हाताळावं आणि योग्य मार्ग दाखवावा असा सल्ला ट्विटवरुन दिला आहे. अनेकांनी ट्विटवरुन पृथ्वीला पाठिंबा दर्शवणारे ट्विट केले आहेत. मात्र या सर्व ट्विटमध्ये चर्चा आहे ती इंग्लंडला गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या एका ट्विटची.

आर्चरने १६ सप्टेंबर २०१५ रोजी केलेले एक ट्विट केले होते. यामध्ये आर्चरने ‘कमनशिबी शॉ’ असं ट्विट केलं आहे.

आर्चरने हे ट्विट कोणत्या संदर्भात केले होते याबद्दल माहिती समोर आलेली नसली. तरी नेटकऱ्यांनी आर्चरला पृथ्वी शॉचे भविष्य ठाऊक होते अशा अर्थाचे ट्विट केले आहेत.

या माणसाने सगळ्याबद्दल ट्विट केलं आहे

भावा भारतात येऊन कुंडली तपास

भावा काय खातो?

कसं जमतं

देवा नमस्कार

चल आता हे पण सांगून टाक

उपाधी

माझ्या होणाऱ्या बायकोचं नाव सांग

दरम्यान, अविनाश सिंग या एका फॉलोअरने आर्चरने हे ट्विट मँचेस्टर युनायटेडच्या लॉकी शॉबद्दल केल्याचे ट्विट करुन म्हटले आहे.

काय आहे सत्य

चॅपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेदरम्यान मँचेस्टर युनायटेडच्या लॉकी शॉला दुखापत झाली. १५ सप्टेंबर २०१५ रोजी लॉकी शॉवर शस्त्रक्रिया होणार असल्याचे क्लबने जाहीर केले. त्याच्या दुसऱ्या दिवशी आर्चरने आर्चरने ‘कमनशिबी शॉ’ असं ट्विट केलं होतं.

याआधीही विश्वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर आर्चरचे एक चार वर्षांपूर्वीचे ट्विट चर्चेत आले होते. त्याने केलेल्या ट्विटमध्ये ६ चेंडूंत १५ धावा, लॉर्ड्सवर जाण्याची इच्छा, सुपर ओव्हर टाकायलाही आवडेल असे काही ट्विट होते. त्यामुळे नेटकरी जोफ्रा आर्चरला नेटकरी आता ज्योतिषाचार्य म्हणून ओळखू लागले आहेत.