काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलुंड पूर्व येथे एका फूटपाथवर २४×७ लायब्ररी उभारली आहे जिथे लोक येऊन मोफत पुस्तके घेऊ शकतात. खंडोबा मंदिर चौकातील ग्रंथालयात विविध विषयांवरील २००० हून अधिक पुस्तकांचा संग्रह आहे, जी मुख्यत्वे मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांनी दान केलेली आहे. नोंदवहीवर त्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहून कोणीही त्यांच्या आवडीचे पुस्तक उचलू शकतो आणि ते विनामूल्य घेऊन जाऊ शकतो आणि नंतर ते परत करू शकतो.
सदानंद देसाई, यांत्रिक अभियंता, जयवंत हरगुडे, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त, दीपक खेडकर, पत्रकार, जयश्री बिसे या ज्येष्ठ नागरिकांनी ग्रंथालयाला पुस्तके दान केली आहेत.
(हे ही वाचा: दोन जेसीबींनी मिळून केला तिसर्यावर हल्ला, मजेदार व्हिडीओ सोशल मिडीयावर Viral)
७३ वर्षीय देसाई यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, “माझ्या दिवंगत पत्नीला आणि मला पुस्तके वाचायला आणि त्याचं कलेक्शन करायला खूप आवडायचे. आमच्याकडे ५०० हून अधिक पुस्तकचं कलेक्शन होतं. तिचे निधन झाल्यानंतर, मला वाटले की मी पुस्तके दान करावी जेणेकरून लोकांना ती विनामूल्य वाचता येतील.”देसाई पुढे सांगतात की, “हा एक चांगला उपक्रम आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ज्या फूटपाथवर लायब्ररी आहे त्या ठिकाणी कमीत कमी वाहनांची रहदारी आहे आणि त्याभोवती थोडी हिरवळ आहे.”
(हे ही वाचा: कुत्र्याची म्हशीवरची सवारी बघितली का? Video सोशल मीडियावर होतोय व्हायरल!)
ही कल्पना मांडणारे ज्येष्ठ नागरिक रमेश मेश्राम म्हणाले की, “आजकाल घरातील प्रत्येकजण आपापल्या फोनशी जोडलेला असतो, तेव्हा मला वृद्धांना अशी जागा हवी होती जिथे ते बसून वाचू शकतील किंवा पुस्तक घरी घेऊन जाऊ शकतील. ज्यामुळे त्यांचा चांगला टाइमपासही होईल. जवळच केळकर कॉलेज आहे आणि तिथून जाणारे विद्यार्थी घरी जाताना पुस्तके घेतात.”
(हे ही वाचा: Video: म्युझिक व्हिडीओ शूट करताना गायिकेच्या चेहऱ्याला चावला साप, धक्कादायक क्षण कैमेऱ्यात कैद!)
लोकांना कसं वाटला हा उपक्रम?
ITI विद्यार्थी शुभम गावंड सांगतो की, “मी सार्वजनिक भाषणाशी संबंधित एक पुस्तक उचलले कारण मला सादरीकरणादरम्यान श्रोत्यांना संबोधित करताना माझा आत्मविश्वास वाढवायचा होता.” हिना सावला या रहिवासी म्हणाल्या की, “मी एक प्रेरणादायी पुस्तक उचलले. हा एक चांगला उपक्रम आहे आणि मला आशा आहे की यामुळे लोकांना पुस्तके वाचण्यास मदत होईल.”ओपन वाचनालय हे २४ तास खुले असते. “पुस्तके चोरीला जातील असे काही लोक म्हणाले, पण आम्हाला त्याची चिंता नाही. लोकांना पुस्तके वाचायला मिळावीत हा आमचा प्रयत्न आहे,” मेश्राम पुढे म्हणाले.