जंगलाचा राजा सिंह आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र, हत्तीला देखील जंगलाचा महाराजा म्हणणं चुकीचे ठरणार नाही. कारण सिंहाला जसे घाबरतात, तसंच हत्तीला घाबरण्याव्यतिरिक्त त्याचा आदरही करतात. प्रवास करताना तुम्ही अनेकवेळा टोल टॅक्स भरला असेल. मात्र, एखाद्या हत्तीला टोल टॅक्स घेताना तुम्ही पाहिलंय का? नसेल, तर हा व्हिडीओ एकदा पहाच. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये जंगलाच्या मध्यभागातून जाणाऱ्या रस्त्यावर टोल टॅक्स भरला जात आहे, पण तो एखाद्या माणसाला दिला जात नसून हत्तींना दिला जातोय.

आईएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ नुकताच पोस्ट केला आहे. जो लोकांना प्रचंड आवडतोय. हा व्हिडीओ मजेशीर असल्यासोबतच आश्चर्यकारक देखील आहे. कारण ह्या व्हिडीओत हत्ती चक्क टॅक्स घेताना दिसत आहेत. शेवटी हत्ती असा टॅक्स कसा घेऊ शकतात असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच ना? तर जाणून घ्या व्हायरल व्हिडीओ मागची सत्यता.

canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Taiwan Earthquake
Taiwan Earthquake : भूकंपाची चाहूल लागताच कुत्र्याने घरातल्या लोकांना केले सावध, तैवान येथील भूकंपाचा व्हिडीओ व्हायरल

( हे ही वाचा: VIRAL VIDEO : वैमानिक मुलानं पालकांना दिलं भन्नाट सप्राईज; हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल त्याचं कौतुक)

आईएफएस अधिकारीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये जंगलाच्या मध्यभागी एक रस्ता जात असल्याचे दिसून येत आहे. ज्या रस्त्यामध्ये ऊसाचा माल घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध उभा आहे, तर दोन हत्ती ट्रकच्या समोर उभे आहेत. जेव्हा ट्रकवरचा माणूस ऊसाचा ढिगारा रस्त्याशेजारी फेकतो, ते पाहून हत्ती त्या दिशेने धावतात आणि मग रस्ता ट्रक पुढे जाण्यासाठी मोकळा होतो. जोपर्यंत ते ऊस देत नाहीत, तोपर्यंत हत्ती मार्ग सोडत नाहीत. आईएफएस अधिकारी परवीन यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, शेवटी तुम्ही या टॅक्सला काय म्हणाल?

( हे ही वाचा: बेडवर उशी ठेवून ‘युट्यूब’ पाहणाऱ्या स्मार्ट माकडाचा व्हिडीओ झाला व्हायरल; पहा VIRAL VIDEO)

नेटीझन्सची प्रतिक्रिया

सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत असून, याला ४२ हजारांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी या व्हिडीओला कंमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी या व्हिडीओवर कमेंट करत हा प्रेमातून घेतलेला टॅक्स असल्याचं म्हटलंय. त्याचवेळी एका व्यक्तीने कंमेंट करत हा जंगलाचा टोल टॅक्स असल्याचं म्हटलंय. तसंच एका महिलेने जंगलातही भयंकर वसुली होत असल्याची गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.