पोटात खडे तयार होणे ही आजच्या काळातील सामान्य समस्या झाली आहे. पित्ताशयातील खडे, मुतखडे असे अनेक शब्द आपल्या कानावर सतत पडत असतात. अशा परिस्थितीत रुग्णाची शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील खडे बाहेर काढले जातात, अशा ऑपरेशन्स आणि खडे काढण्याशी संबंधित अनेक बातम्या आपण वाचल्या आहेत. परंतु सध्या अशी एक घटना समोर आली आहे, जी वाचल्यावर तुम्ही थक्क व्हाल यात शंका नाही.

हो कारण सध्या चेन्नईतील डॉक्टरांनी एका महिलेवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून एक दोन नव्हे तर तब्बल १२४१ खडे बाहेर काढले आहेत. डॉक्टरांनी जेव्हा हे खडे बाहेर काढत होते तेव्हा खड्यांची सख्या पाहून त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला होता. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर महिला सुखरुप असल्याचंही डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

हेही पाहा- “हृदयस्पर्शी” रमजानचे नमाज पठण करणाऱ्या इमामवर अचानक मांजरीने उडी मारली अन्…, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

महिलेला होता मधुमेहाचा त्रास –

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पश्चिम बंगालमध्ये राहणारी ५५ वर्षीय महिलेला मधुमेहाचा त्रास होता. तिला सतत पोटदुखी, भूक न लागणे, अपचन, पोटात गॅस होणे अशा अनेक समस्या सतावत होत्या. आठवडाभरापूर्वी तिची तब्यत जास्तच बिघडल्यानंतर तिला चेन्नईतील डॉ. मोहन यांच्या डायबिटीज स्पेशालिटी सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. या रुग्णालयातील डॉक्टरांनी महिलेच्या पोटाचा अल्ट्रासाऊंड केला. अल्ट्रासाऊंड रिपोर्ट्स पाहून डॉक्टरदेखील थक्क झाले, कारण या महिलेच्या पित्ताशयात एक दोन नव्हे तर तब्बल १२४१ छोटे खडे तयार झाल्याचं डॉक्टरांना समजलं. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा- “ते फोटो…” कर्मचाऱ्याने १२ दिवसांची रजा मागताच बॉसने मागितला विचित्र पुरावा, नेटकऱ्यांनीही व्यक्त केला संताप

पित्ताशयाची पिशवी फुटण्याचा धोका –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसआरएम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. आर बालमुरुगन यांनी महिलेवर शस्त्रक्रिया करण्याची तयारी केली. या महिलेची लॅपरोस्कोपिक कोलेसिस्टेक्टोमी करण्यात येणार होती. डॉक्टरांनी या वेळी योग्य वेळी उपचार केले नसते तर महिलेचे पित्ताशय फुटण्याचाही धोका होता. डॉक्टरांनी वेळीच रोगाचे निदान करुन योग्य उपचार केल्याने महिलेचे प्राण वाचले असल्याची माहिती असे ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. ब्रिजेंद्र कुमार यांनी दिली.