सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतो. आतापर्यंत आपण अनेक नेते अभिनेते यांचे आवाज काढणारे मिमिक्री आर्टिस्ट पाहिले असतील. मात्र आता प्राणीही दुसऱ्या प्राण्याचा आवाज काढत असल्याचं दिसत आहे. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. कुत्र्याचं पिल्लं भुंकण्याऐवजी कोंबड्यासारखा आरवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ कोणत्या तरी गावातील असल्याचं दिसत आहे. एका घरात कुत्रा आणि कोंबड्या पाळल्याचं दिसत आहे. सकाळी सकाळी कोंबडा आरवतो त्यानंतर कुत्रा त्याची नक्कल करताना दिसत आहे. कुत्र्याचा आवाज ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. नक्की कुत्र्याने असं केलं का हा प्रश्न पडेल. यासाठी काही नेटकरी हा व्हिडीओ वारंवार पाहात आहेत. त्यानंतर आपली मतं व्यक्त करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. या व्हिडीओखाली नेटकरी मजेशीर कमेंट्स देत असून आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.