Viral Video : सोशल मीडियावर पाळीव प्राण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकजण त्यांच्या पाळीव श्वानांचे व्हिडीओ शेअर करतात. सध्या श्वानांचा असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक होऊ शकता.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन श्वान चारचाकी गाडीत बसलेले असतात. अचानक त्यांना गाडीच्या बाहेर एक श्वान दिसतो. तेव्हा गाडीस बसलेले श्वान खिडकीतून डोके बाहेर काढतात आणि बाहेर उभ्या असलेल्या श्वानाला प्रेमाने बघतात. एक भावनिक संवाद त्यांच्यामध्ये दिसून येतो. यावरुन तुम्हाला कळेल की प्राण्यांना गरिबी श्रीमंती कळत नाही त्यांना फक्त एकच प्रेमाची भाषा समजते. श्वानांच्या या खास मैत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा : म्हातारपणातही जपतायत मैत्री, एकमेकांचा हात पकडून चालतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल
raunaksingh1170 या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “कोण गरिब कोण श्रीमंत, त्यांना फरक कळत नाही. त्यांना कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसतो. त्यांना फक्त प्रेमाची भाषा कळते.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, ” हाच माणूस आणि प्राण्यांमधील फरक आहे” तर एका युजरने लिहिले, “माणसाने बऱ्याच गोष्टी कुत्र्यांपासून शिकायला पाहिजे” आणखी एका युजरने लिहिले, “मैत्री असावी तर अशी.. अप्रतिम व्हिडीओ”