चीन आणि त्या देशातील वाहतूक कोंडी ही आता मोठी समस्या बनत चालली आहे. येथील वाहतूक कोंडीची समस्या किती मोठी आहे याचे उदाहरण म्हणजे सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ. ३१ डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करून लोक शहरात परतत होते तेव्हा राजधानी बिजिंगसह अनेक महत्त्वाच्या शहरातील टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी इतकी मोठी होती की वाहाने तीन ते चार तासांहूनही अधिक काळ वाहतूक कोंडीत अडकून पडली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Viral Video : वाहतूक कोंडीतही महिलांना नृत्य करण्याचा मोह अनावर

जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून चीन ओळखला जातो. लोकसंख्या ही तर या देशाची समस्या आहेच पण त्याचबरोबर बेरोजगारी, मोठ्या प्रमाणात प्रदूषण, वाहतूक कोंडी, अपूरी जागा यारख्या अनेक समस्या येथे आहेत. अशातच जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत बिजिंग शहर अग्रस्थानी आहे. गेल्या दोन दिवसांपासून या शहरातील प्रदूषणाची पातळी खालावली आहे. प्रदूषण आणि त्यातून धूक्यांच्या विळखा शहराभोवती पडला आहे त्यामुळे काहीच दिसेनासे झाले आहे. अशातच तीन दिवसांची सुट्टी साजरी करून शहरात परतत असणा-या चालकांना वाहने चालवण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. भरीस भर म्हणजे अनेक जण सुट्टी घालवून शहरात परतत आहे त्यामुळे ही कोंडी आणखी वाढली आहे. या वाहतूक कोंडीची ड्रोनद्वारे टिपलेली काही दृष्ये व्हायरल होत आहेत.

बिजिंग आणि अन्य महत्त्वाच्या शहरातील टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली दिसून येत आहे. या वाहतूक कोंडीमुळे चालक तीन ते चार तासांहून अधिक काळ अडकून पडले होते. तब्बल ४० लेनच्या बिजिंग मकाऊ हाँगकाँग महामार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. ऑक्टोबरमध्येही अशीच वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. धुक्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर ५० किलोमीटर दूर दूर पर्यंत रांगा लागल्या होत्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drone footage of giant traffic jam in china
First published on: 04-01-2017 at 10:22 IST