scorecardresearch

मद्यपीने घेतला रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्याचा जीव; फुकटात भेळपुरी देण्यास दिला होता नकार

गुरुग्राममध्ये एका मद्यपीने एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने मोफत भेळपुरी देण्यास नकार दिल्याने त्याची हत्या केली.

gurgam news
प्रातिनिधिक फोटो

दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये एका ४० वर्षीय व्यक्तीची दारूच्या नशेत एका व्यक्तीने हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, हरियाणातील गुरुग्राममधील एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने आरोपीला भेळपुरी मोफत देण्यास नकार दिल्याने त्याची त्याने हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, भेळपुरी विक्रेता रमेश राम हा मूळचा बिहारमधील कटिहार येथील आहे.

(हे ही वाचा: …अन् बुट काढून सलमान खानने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला केलं अभिवादन; महाराष्ट्रभरात Video चर्चेत)

ही घटना सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास सेक्टर ५० मध्ये घडली. राम हा सायकलवरून आपल्या घराकडे जात असताना घरकाम करणारी त्याची पत्नी सुमित्रा देवी त्याच्या मागे जात होती. देवी यांनी तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, एक अर्धनग्न माणूस आजूबाजूला फिरत होता आणि त्याने एक दगड उचलला आणि तिच्या पतीकडे जबरदस्तीने फेकला आणि दगड त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस लागला.त्यांनी सांगितले की, राम सायकलवरून पडला आणि लोक जमा होताच आरोपी विजयने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी देवीच्या तक्रारीचा हवाला देत सांगितले की, काही लोक तिच्या पतीला रुग्णालयात घेऊन गेले जेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

(हे ही वाचा: Viral Photo: या फोटोत लपलंय हरीण, तुम्ही शोधू शकता का?)

एसएचओने सांगितले की, “आरोपी मद्यधुंद अवस्थेत परिसरात फिरत होता आणि त्याने मोफत भेळपुरी मागितली. भेळपुरी देण्यास नकार दिल्याने त्याने हल्ला केला. पुढील तपास सुरू असून आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे एसएचओने सांगितले. आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Drunk man kills a street food vendor in gurugram as he refuses to give free bhelpuri ttg

ताज्या बातम्या