या दिवसात लग्नसराई सुरू आहे. यादरम्यान सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेशीर व्हिडीओ येत असतात. सोशल मीडियावर वधू-वरांचे नाचतानाचे अनेक व्हिडीओही आपल्याला पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाठवणीच्या वेळी नववधू केला हटके डान्स

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका वधूच्या निरोपाचा आहे. यामध्ये नववधू दुःखी नसून पाठवणीच्या वेळी आनंद लुटताना दिसत आहेत. पाठवणीच्या वेळी ही नववधू एक अतिशय मजेदार डान्स करत घरातून निघत आहे. गंमत म्हणजे नववधू ‘गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल’ या गाण्यावर आनंदाने नाचत आहे.

( हे ही वाचा:क्रॉसिंगवर ट्रेन कारला धडकली पण महिला चालकाला ओरखडासुद्धा आला नाही! थरारक घटनेचे फोटो Viral )

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की जेव्हा वधू सुरुवातीला घरातून बाहेर पडते तेव्हा ती खोटे अश्रू पुसताना दिसते. त्यानंतर ती हसायला लागते. त्यानंतर व्हिडी ओमध्ये ‘गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल’ हे गाणे वाजताना ऐकू येते. यानंतर नववधू या गाण्यावर डोलायला लागते. लाल रंगाचा लेहेंगा परिधान केलेली नववधू खूपच सुंदर दिसत आहे. या गाण्यावर ती तिचा लेहेंगा उचलते आणि नाचू लागते.

( हे ही वाचा: दुसऱ्या लग्नासाठी मिरवणूक घेऊन नवरदेव पोहोचला मुलीच्या घरी, पहिली बायको समोर उभी दिसली, मग.. )

( हे ही वाचा: महिलेला जेवणात आढळला असा पदार्थ की… VIDEO पाहून तुम्ही चक्रावून जाल! )

वधू व्यवसायाने आहे मेकअप आर्टिस्ट

‘फेअरवेल विथ ट्विस्ट’ नावाने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ theweddingstories नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. येथून हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सध्या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या वधूचे नाव मानसी गोस्वामी आहे. ती व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: During the bidhai the bride danced loudly to the song gaadi wala aaya ghar se kachra nikal watch viral video ttg
First published on: 09-12-2021 at 17:28 IST