हॉलीवडूचा प्रसिद्ध गायक ED Sheeran हा गेल्या काही दिवसांपासून भारताच्या दौऱ्यावर आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांने पंजाबी गायक दिलजीत दोसांझ बरोबर कॉन्सर्ट शो केला होता. तसेच मुंबईतील एका शाळेतही त्याने भेट दिली होती. विद्यार्थ्यांसह लाईव्ह परफॉर्मन्स दिला. तसेच अभिनेता गायक आयुष्यमान खुरानाचीही भेट घेतली. तसेच तो प्रसिद्ध गायक अरमान मलिक आणि शाहरुख खानसह थिरकतानाही दिसला. दरम्यान आता त्याचा एक नवा व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये ED Sheeran ने महाराष्ट्राच्या झणझणीत मिसळचा आस्वाद घेतला आहे. भारतीय खाद्यपदार्थांसाठी त्याची आवड पाहून त्याचे चाहते खुश झाले आहे. सोशल मिडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

खरं तरED Sheeran भारतामध्ये त्याच्या म्युझिक कॉन्सर्टसाठी आला आहे. त्याला भारतामध्ये फिरायला, येथील लोकांना भेटायला आणि येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला फार आवडते. नुकतेच ED Sheeran ने प्रसिद्ध शेफ संज्योत खीर यांच्या महाराष्ट्राची झणझणीत मिसळ बनवली आहे. प्रसिद्ध शेफ संज्योत खीर यांच्या युअर फुड लॅब या युट्युब चॅनलवर त्याचा मिसळ बनवताचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शेफ खीर यांच्याबरोबर ED Sheeran मिसळ बनवताना दिसत आहे. एडी ED Sheeran स्वत: च्या हाताने मिसळ बनवताना दिसत आहे. तर शेफ खीर त्याचे मार्गदर्शन करत आहे.

हेही वाचा –“थकलेल्या जीवाला सावलीचा विसावा”, कडक उन्हात रस्त्याच्या कडेला दुचाकीवरच झोपला डिलिव्हरी बॉय! Video Viral

ED Sheeranने सांगितले की, “तो पहिल्यांदा एखादा भारतीय पदार्थ बनवत आहे.” ED Sheeran झणझणीत मिसळ बनवतो आणि मिसळचे ताट देखील वाढतो आहे. त्यासाठी शेफ खीर त्याची मदत करतात. ED Sheeranच्या काही चाहत्यांना ही मिसळ खाण्याची संधी देखील मिळते. त्यानंतर स्वत: बनवलेल्या मिसळवर तो ताव मारताना दिसत आहे. त्याला झणझणीत मिसळ खूप आवडली आहे असे व्हिडीओमध्ये दिसते.

व्हायरल व्हिडीओ पाहून अनेक चाहत्यांना विश्वास बसत नाही. व्हिडीओला लाखो चाहत्यांची पसंती मिळाली आहे तर अनेकांनी कमेंट करत आश्चर्य व्यक्त केले आहे. एकाने कमेंट केली की, “कोणी कल्पना केली होती की ED Sheeran मिसळपाव खाईन”

ED Sheeran च्या एका चाहत्याने सांगितले की, तो कोल्हापूरचा आहे. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला मिसळपाव डेटवर प्रपोज केले होते आणि
ED Sheeranच्या गाण्यावर लग्नात डान्स केला होता. स्वयंपाक करणे ही माझी आवड आहे. माझ्यासाठी हा व्हिडीओ अत्यंत भावनिक गोष्ट आहे. थँक्यू शेफ”

हेही वाचा – “माणसाने माणसाशी माणसासम वागणे”! भुकेल्या श्वानाला तरुणाने खायला दिले बिस्किट; पाहा सुंदर व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसरा म्हणाला, की ED Sheeran चा भारतातील प्रवास पाहून त्याच्यावर आणखी खुश होत आहे. तो किती साधा आहे हे पाहून मी प्रभावित झाले आहे. तो अशा प्रवशांपैकी आहे जो स्वत:ला संस्कृतीमध्ये सामावून घेतो.