देशभरात सध्या आगामी निवडणुकीत मतदानासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशातच दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह अनेक व्हिडीओ शेअर केले जात आहेत. यात आप पक्षाच्या पोस्टर्ससंदर्भात असाच एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात येत आहे, ज्यात असा दावा केला जात होता की, आचारसंहिता लागू असताना आम आदमी पक्षाचे होर्डिंग हटवण्यात आले, मात्र भाजपाचे झेंडे हटवले गेले नाही. ज्यावरून निवडणूक आयोग आम आदमी पक्षासोबत भेदभाव करत असल्याचा आरोप केला जात आहे.

मात्र, लाइटहाऊस जर्नलिझमला तपासादरम्यान हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आढळले. तसेच तपासादरम्यान व्हायरल व्हिडीओदेखील जुना असल्याचे आढळले.

electoral bonds and supreme court
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधी सरकारने १० हजार कोटींचे निवडणूक रोखे छापण्यास मंजुरी दिली
pm narendra modi interview marathi (1)
Video: तपास यंत्रणांच्या गैरवापराबाबत नरेंद्र मोदींना थेट प्रश्न; उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले…
Supreme court Justince Bhushan Gavai
“सरकार आणि कार्यकारी मंडळ अपयशी ठरत असताना…”, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे मोठे विधान
maneka gandhi varun gandh
भाजपाने वरुण गांधींचं लोकसभेचं तिकीट कापलं, आई मनेका गांधी म्हणाल्या, “या निवडणुकीनंतर…”

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Sakshi Gupta AAP ने व्हायरल व्हिडीओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला.

या पोस्टचा आर्काइव्ह व्हर्जन बघा.

https://archive.ph/ElbMS

इतर युजर्सदेखील याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही आधी हा व्हिडीओ नीट निरखून बघितला. या व्हिडीओवर इन्स्टाग्राम वॉटरमार्क होता, त्यावर ‘NSUI Rajasthan Official’ असे लिहिले होते.

आम्ही NSUI Rajasthan च्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर हा व्हिडीओ शोधला.

तेव्हा हा व्हिडीओ १४ जानेवारी २०२४ रोजी पोस्ट करण्यात आला होता.

रीलच्या कॅप्शनमध्ये असे लिहिण्यात आले आहे की, जे बॅनर काढले जात आहेत ते त्यांचेच आहेत, अर्थात एनएसयूआयचे.

आम्हाला हा व्हिडीओ एनएसयूआयच्या फेसबुक अकाउंटवरदेखील आढळून आला.

काढण्यात आलेले पोस्टर्स आम्ही बारकाईने पाहिले, पोस्टर्सवरील नाव हे विनोद जाखड यांचे असल्याचे लक्षात आले.

आम्हाला जानेवारी महिन्यातील विनोद जाखड यांच्या संदर्भातील एक बातमीदेखील सापडली.

https://www.livehindustan.com/rajasthan/story-ras-mains-exam-after-kirori-lal-vinod-jakhar-increased-bhajanlal-sharma-headache-9199131.html

आचारसंहिता लागू झाल्यामुळे पोस्टर काढून टाकण्यात आल्याच्या काही बातम्या देखील आम्हाला आढळल्या.

https://news.abplive.com/elections/general-elections-2024-posters-removed-in-badaun-as-model-code-of-conduct-kicks-in-for-lok-sabha-polls-1672550
https://www.thehindu.com/news/national/karnataka/posters-flexed-pulled-down-political-representatives-told-to-adhere-to-model-code-of-conduct/article67961470.ece

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही राजस्थानचे एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष विनोद जाखड यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. ते म्हणाले, “राज्याध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर मी जयपूरला आलो तेव्हा एनएसयूआयच्या स्वयंसेवकांनी माझ्या पोस्टर्सने शहर सजवले होते. जयपूर महानगरपालिकेला रितसर सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानादेखील वारंवार विनंती करूनही महानगरपालिकेच्या लोकांनी सर्व पोस्टर्स काढून टाकले. काही पोस्टर्स तर माझ्या समोरच काढले गेले, पण भाजपाच्या झेंड्यांना त्यांनी हातदेखील लावला नाही.”

निष्कर्ष : जानेवारी २०२४ मध्ये NSUI नेते विनोद जाखड यांचे पोस्टर काढताना दाखवणारा जुना व्हिडीओ, आचारसंहिता लागू असताना भाजपाचे झेंडे तसेच ठेऊन आपचे पोस्टर्स काढण्यात आल्याचा दावा करून शेअर केला जात आहे, त्यामुळे व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून केला जाणारा दावा दिशाभूल करणारा आहे.