ई-मेल कसा लिहावा आणि त्यात काय लिहावे हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एका लेखकाने चक्क ‘स्कर्ट’चं उदाहरण दिलं आहे. ‘ई-मेल हा स्कर्टप्रमाणे तोकडा असावा’ असं त्यांनी म्हटलं आहे. दिल्ली विद्यापीठाच्या ‘बेसिक बिझनेस कम्युनिकेशन’ च्या तृतीय वर्षातील अभ्याक्रमाच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारची धक्कादायक उदाहरणं देण्यात आल्याने आता याची जास्तच चर्चा होत आहे. ‘एस चंद आणि कंपनी’ यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकात ‘ई-मेल एटिकेट्स’ नावाचा धडा आहे. ज्यात ई-मेल लिहिताना कोणते मुद्दे लिहावेत आणि तो कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले आहे. या धड्याचे लेखक सी. बी. गुप्ता यांनी दिलेल्या उदाहरणामुळे तर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘ई-मेल हा स्कर्टसारखा तोकडा असावा, मजकूर नेमका असेल तर तो पटकन वाचून होऊ शकतो आणि त्यातून सर्व महत्त्वाचे मुद्देही समोरच्यापर्यंत पोहोचवता येतात. जर का ई-मेलमधला संदेश दीर्घ असेल तर शक्यतो तो वाचलाच जात नाही किंवा तो गांभीर्याने घेतला जात नाही, असं त्यांनी एका परिच्छेदात म्हटलं आहे. विद्यापीठातल्या अनेक विद्यार्थ्यांनी यावर आता आक्षेप घेतला आहे. तेव्हा गुप्ता यांनी माफी मागितली आहे. तसेच आपल्या पुढील आवृत्तीतून हा भाग वगळण्याची हमी वाचकांना दिली आहे.

वाचा : ‘आयएएस’ अधिकारी होण्यासाठी त्याने नाकारली २२ लाखांची नोकरी