Viral Video Today Emotional: वडील आणि लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे असे म्हणतात आणि खरोखरच सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ या वाक्याची सार्थ पटवून देतो असे म्हणायला हरकत नाही. आपले बाबा १५ दिवसांनी घरी येणार हे कळताच या व्हायरल होणाऱ्या चिमुकलीच्या डोळ्यात जे प्रेम दिसतंय ते पाहून अगदी दगडालाही पाझर फुटेल. नेटकऱ्यांनी तर या लाडूबाईला पाहून आपल्याही घरी अशी लक्ष्मी जन्माला यावी अशी इच्छा कमेंट बॉक्समध्ये व्यक्त केली आहे. नेमकं असं या व्हिडीओमध्ये आहे तरी काय चला पाहूया.

@babyviha30 या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये एक चिमुकली छान समर वाईब असलेला कॉटन फ्रॉक घालून दिसतेय. यावेळी तिची आई मागून पप्पा आले असे सांगते, हे ऐकताच या बाळाच्या आनंदाला पारावरच उरत नाही. ती अगदी बोलता येईल त्या पद्धतीने उड्या मारून, टाळ्या वाजवून आपल्या बाबांच्या वाटेकडे नजर लावून असते. बाबा येताच तिला उचलून घेतात आणि खरोखरच एका क्षणात आपल्यासारख्या प्रेक्षकांच्या डोळ्यातही पाणी येऊ जाते.

Video: १५ दिवसांनी लाडूबाईचे बाबा घरी आले आणि..

हे ही वाचा<< सचिन तेंडुलकरने भेट दिलेल्या कोकणातल्या फार्म स्टेची झलक; दिवसाचे भाडे, जेवणाची सोय व पॅकेज जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विहाच्या या व्हिडिओवर तब्बल ३६ लाखाहून अधिक व्ह्यूज व लाखो लाईक्स व कमेंट्स आहेत. अलीकडे अनेक पालक आपल्या लहान मुलांचे सोशल मीडिया पेज खूप सुरुवातीपासूनच बनवून ठेवतात ज्यावर त्यांच्या बालपणीचे अनेक सुंदर क्षण शेअर केले जातात. तुम्हाला आठवत असेल तर माझी तुझी रेशीमगाठ मधील परी म्हणजेच मायरा वायकुळ, नवा गडी नवा राज्य मधील चिंगी यासारख्या अनेक बालकलारांना सुद्धा मालिकेत काम याच सोशल मीडिया अकाऊंटची प्रसिद्धी पाहून मिळाले होते. सध्या व्हायरल होणाऱ्या विहाचे सुद्धा सध्या हजारो फॉलोवर्स आहेत. तिचा हा गोड व्हिडीओ व अन्यही शॉर्ट क्लिपमधील क्षण प्रेक्षकांना खूप आवडतात.