Emotional video: प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात कारण लोक हे व्हिडिओ फक्त पाहत नाहीत तर ते आपल्या मित्र आणि नातेवाईकांसोबत देखील शेअर करतात. एक काळ होता जेव्हा लोकांना प्राण्यांच्या जगण्याबद्दल जाणून घेण्यासाठी टीव्हीवर अवलंबून राहावे लागत होते, परंतु आता काळ पूर्णपणे बदलला आहे. आता लोक सोशल मीडियावर सक्रिय राहून सर्व काही जाणून घेऊ शकतात.हत्तीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात ज्यामध्ये हत्तीची वेगवेगळी रुपे पहायला मिळतात. एका कॉलवर आपल्यासाठी धावत येणारा, आपली प्रत्येक सुख-दुःख जाणून घेणारा तो एक ‘मित्र’ प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो. पण, मानवांप्रमाणेच प्राण्यांमध्येहीदेखील घट्ट मैत्री असते. याचं एक उत्तम उदाहरण आज सोशल मीडियावर पाहायला मिळालं आहे.
दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता. पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का? त्याला कारणही तसंच आहे. आपल्याला माहिती आहे रक्ताचीही नाती कधी कधी उपयोगी पडत नाही मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात.सोशल मीडियावर एका हत्तीचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओत हत्ती आपला सहकारी, मित्राचा मृत्यू झाल्यानतंर शोक व्यक्त करताना दिसत आहे. रिपोर्टनुसार, जेनी आणि मॅग्डा हे २५ वर्षांपासून एकत्र होते. पण अखेर मृत्यूने त्यांना वेगळं केलं आहे, रशियातील सर्कशीत त्यांची ही जोडी प्रसिद्ध होती. जेनीच्या मृत्यूनंतर मॅग्डा शोक व्यक्त करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
जेनी अचानक कोसळली. यामुळे मगदाला धक्का बसल्याचं व्हिडीओत दिसत आहे. मॅग्डा जेनीला उठवण्याचा प्रयत्न करताना व्हिडीओत दिसत आहे. पण जेनीचा श्वास थांबला असल्याने तिची काही हालचाल होताना दिसत नाही. जेनी काहीच उत्तर देत नसल्याचं पाहून अखेर मॅग्डा तिच्याभोवती आपली सोंड गुंडाळते आणि तिला सोडण्यास नकार देते.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर ही Brian McDonald या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत तुम्हाला या खास मित्रांची झलक पाहता येईल आणि कॅप्शनमध्ये त्यांच्या मैत्रीची अनोखी गोष्टही वाचता येईल.