Viral Post : यूको बँकेच्या एका वरिष्ठ अधिकार्यावर गैरवर्तन केल्याचे आरोप करणाऱ्या एका इंटरनल ईमेलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ज्यामुळे त्याच्यावर सर्वत्र तीव्र टीका केली जात आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या या ईमेलच्या फोटोवर वापरकर्ते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
हा ईमेल बँकेच्या वरिष्ठ व्यपस्थापनाला उद्देशून पाठवण्यात आला आहे आणि ईमेलचा विषय- “चेन्नई येथील विभागीय प्रमुखांच्या अमानवी आणि विषारी वर्तनाची तक्रार – तातडीने कारवाई करण्याची विनंती,” असा आहे. या मेलमध्ये कर्मचाऱ्याने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.
यातील तक्रारीनुसार, चेन्नई विभागाचे विभाग प्रमुख आर. एस. अजित यांच्यावर भीती आणि दडपशाहीचे वातावरण तयार केल्याचा आणि अधिकार्यांना प्रोफेशनल्स ऐवजी हाताखालील कर्मचाऱ्यांप्रमाणे वागवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या ईमेलमध्ये अजित यांचे वर्णन हुकूमशाही वृत्तीचे, शिवीगाळ करणारे आणि असंवेदनशील असे करण्यात आले आहे आणि याबरोबरच अत्यंत तातडीच्या वैयक्तिक अडचणीच्या काळातही कर्मचाऱ्यांच्या रजा सतत नाकारल्याच्या अनेक घटनांचा उल्लेखही या ईमेलमध्ये करण्यात आला आहे.
तक्रारीमध्ये अनेक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. एका वेळी जेव्हा ब्रँच हेडची आई आयसीयूमध्ये होती तेव्हा अधिकाऱ्याने सुट्टी मंजूर करण्याच्या आधीच परत कामावर येण्याची तरीख कन्फर्म करण्याबाबत विचारले होते. तर दुसर्या एका घटनेत ब्रँच हेडच्या आईचे निधन झाल्यानंतर, अजित यांनी कथितपणे वक्तव्य केलं की, प्रत्येकाच्या आई मरते. नाटकी वागू नको, व्यावहारिक व्हा. लगेच कामावर या, अन्यथा मी एलडब्लूपी मार्क करेन,” आणि त्यानंतर त्या अधिकार्याविरूद्ध औपचारिक पत्र देखील जारी केले.
आणखी एक असा आरोप करण्यात आला आहे की, जेव्हा एका ब्रँच हेडच्या एक वर्षाच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि जेव्हा एका अधिकार्याच्या पत्नीला तात्काळ वैद्यकीय मदतीची गरज होती, या अधिकार्याने कार्यालयात उपस्थित राहण्याऐवजी कौटुंबिक एमर्जन्सीला अधिक महत्त्व दिल्यावरून काही नकारात्मक वक्तव्य केली होती.
सोशल मीडियावर होतेय टीका
सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे आणि लोक यावर प्रतिक्रिया देखील देत आहेत. अनेक वापरकर्ते या वर्तवणुकीवर क्रूर आणि अस्वीकार्ह असल्याची टीका करत आहेत. एका वापरर्त्याने याला बारबेरिक डिक्टेटरशीप म्हणटले आहे. इतकेच नाही तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ फायनांशियल सर्व्हिसेस आणि अर्थ मंत्रालयाला टॅक करत या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.