सध्या सोशल मीडियावर एक १५ सेकंदांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर होतोय. हा व्हिडीओ शेअर करणारे या व्हिडीओला दुर्मिळ व्हिडीओ म्हणत त्यासाठी नॅशनल जीओग्राफीने १ मिलियन डॉलर्स खर्च केले आहेत, असा दावा करण्यात येतोय. विशेष म्हणजे माजी सनदी अधिकारी आणि पाँडिचेरीच्या विद्यमान राज्यपाल किरण बेदी यांनी देखील हा व्हिडीओ शेअर करत पाहण्याचं आवाहन केलंय. मात्र, या ट्वीटवर अनेकांनी किरण बेदी यांना ट्रोल केलंय.

किरण बेदींनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये दावा करण्यात आलाय, की नॅशनल जिओग्राफीने या व्हिडीओसाठी १ मिलियन डॉलर खर्च केले आहेत. व्हिडीओत दोन महिला आणि एक पुरुष एका बोटवर असल्याचं दिसतंय. तसेच समोरून त्यांना वाचवण्यासाठी येणारं एक हेलिकॉप्टर जवळ येताच अचानक पाण्यातून एक मोठा मासा उडी मारतो आणि हेलिकॉप्टरला दाताने पकडून पाण्यात ओढतो. यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश होऊन पाण्यात पडते.

किरण बेदी सोशल मीडियावर झाल्या ट्रोल

किरण बेदींनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केल्यानंतर त्या मोठ्या प्रमाणात ट्रोल झाल्या आहेत. कोणी म्हटलं बरं झालं तुम्ही दिल्लीची निवडणूक हरल्या होत्या. प्रसिद्ध लेखक, कवी आणि कॉमेडियन वरूण ग्रोवरने देखील ट्वीट करत किरण बेदी यांना टोला लगावला. तो उपरोधात्मकपणे म्हणाला, “हा व्हिडीओ भारताच्या सर्वोत्तम सिनेमॅटोग्राफर मधु किश्वर यांनी अनेक कॅमेरे वापरून एका टेकमध्ये शूट केला आहे. त्यामुळे जिओग्राफीने त्या व्हिडीओसाठी १ मिलियन डॉलर मोजले आहेत.”

व्हिडीओचं सत्य काय?

हेही वाचा : थरारक! हिमाचलच्या डोंगरदऱ्यातून बस चालवणाऱ्या ड्रायव्हरचा Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ २०२० पासून अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आत्ताही हा व्हिडीओ पुन्हा वास्तवात असं काही घडलंय आणि दुर्मिळ असल्याचा दावा करत शेअर होतोय. मात्र, हा व्हिडीओ २०१७ मधील ‘फाईव्ह हेडेड शार्क अटॅक’ या चित्रपटातील आहे. त्यामुळे या व्हायरल व्हिडीओसोबत गेले जाणारे दावे खोटे आहेत.