सौजन्य- विश्वास न्यूज

अनुवाद – अंकिता देशकर

Loksabha Elections 2024: देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अनेक राजकीय नेत्यांकडून रॅली अन् प्रचार सभांचा धुमधडाका सुरू आहे. त्यातच सोशल मीडियावर राजकीय पक्षाच्या रॅलीदरम्यान महिलेशी असभ्य वर्तन झाल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, हा व्हिडीओ भाजपाच्या निवडणूक रॅलीदरम्यानचा असून, त्यात दिसणारी महिला ही अभिनेत्री कंगना रनौत आहे. रॅलीदरम्यान राजकीय नेत्याने अभिनेत्रीबरोबर असभ्य वर्तन केल्याचे यात म्हटले आहे; पण व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून केला जाणारा दावा खरा आहे की खोटा ते आपण सविस्तर जाणून घेऊ..

काय होत आहे व्हायरल?

एका वापरकर्त्याने विश्वास न्यूजच्या चॅटबॉट नंबरवर व्हॉट्सॲप संभाषणाचा स्क्रीनशॉट पाठवला होता, ज्यामध्ये लिहिले होते की, “एक मोठी छुपी बातमी अशी आहे की, यावेळी निवडणूक आयोगाने पोस्टल बॅलेटमधून मतपत्रिका गायब केली आहे. आता कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला पोस्टल बॅलेटद्वारे आपले मतदान करता येणार नाही.

तपास:

दरम्यान, या पोस्टची पडताळणी करण्यासाठी विश्वास न्यूजने व्हायरल पोस्टमधील मजकूर Google Lens मध्ये कॉपी केला आणि Google Open Search वर सर्च केला. यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक पोस्ट सापडली, ज्यात व्हायरल होणारा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे.

याव्यतिरिक्त, निवडणूक आयोगाच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर आणि डीडी न्यूज लाइव्हने आपल्या फेसबुक अकाउंवर व्हायरल होणाऱ्या दाव्याची पोस्ट खोटी असल्याचे सांगितले आहे.

https://perma.cc/EGX4-UQKF
https://perma.cc/H3S9-RMWY

यावेळी विश्वास न्यूजने भारतीय निवडणूक आयोगाचे सहसंचालक अनुज चांडक यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी व्हायरल पोस्ट खोटी असल्याची पुष्टी केली.

पोस्टल बॅलेट काय आहे?

पोस्टल बॅलेट (Postal Ballots) ही मतदान करण्याची एक पद्धत आहे. या एक प्रकारच्या मतपत्रिकाच असतात. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, मेलचा वापर करून मतदानाचा अधिकार बजावता येतो. केंद्रीय दलांमध्ये असणारे सरकारी कर्मचारी, लष्करातील सैनिक, परदेशामधील दूतावासात वास्तव्याला असलेले सरकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय तसेच निवडणूक कर्तव्यावर असणारे सरकारी कर्मचारी अशा काही ठराविक लोकांना अशा प्रकारे मतदान करण्याचा अधिकार देण्यात येतो. ज्या उमेदवाराला मत द्यायचे आहे, त्याबाबतची माहिती भरून मतपत्रिका मतमोजणीपूर्वी तपासणी अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येतात.

लोकसभा निवडणुका ((Lok Sabha Election 2024) सात टप्प्यांत होणार आहेत, ज्यांची सुरुवात १९ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे आणि ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

निष्कर्ष :

विश्वास न्यूजच्या तपासणीत हा व्हायरल दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, निवडणूक कर्तव्यावरील अधिकाऱ्यांनी नियुक्त मतदार सुविधा केंद्रांवर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय कायम ठेवला आहे. निवडणूक आयोगाने या दाव्याचे खंडन केले आहे. त्यांंनी असे सांगितले की, निवडणूक कर्तव्यावर असलेले अधिकारी नियुक्त मतदार सुविधा केंद्रावर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू शकतात.

(ही कथा विश्वास न्यूजने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता पुनर्प्रकाशित केली आहे.)