सोशल मीडियावर सध्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोमध्ये पुतीन यांना जर्मनीमधील हुकूमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या रुपात दाखवण्यात आलंय. हा फोटो जगप्रसिद्ध टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आल्याचा दावा या व्हायरल फोटोमधून केला जातोय. मात्र हा फोटो खोटा असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक फॅक्टचेक वेबसाईट्सने सोशल मीडियावर सोमवारपासून व्हायरल होणारा टाइम्स मासिकाचं कथित मुखपृष्ठ हे मॉर्फ इमेज म्हणजेच फेरफार करुन बनवण्यात आलेली इमेज असल्याचं म्हटलं आहे. हा फोटो एका ग्राफिक डिझायनरने बनवल्याची माहिती समोर आलीय.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

मागील आठवड्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनवरील युद्ध टाळता येणार नाही म्हणत युक्रेनवर हल्ला करण्याचा आदेश दिला. यानंतर मागील आठवड्याभरापासून युक्रेनमधील अनेक शहरांवर बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले जात आहेत. पुतिन यांनी युक्रेनवर युद्ध लादल्याचा आरोप करत जगभरामध्ये अनेक देशांमध्ये पुतिन यांच्या निषेधार्थ आणि रशियाने हे युद्ध थांबवावं म्हणून आंदोलने केली जात आहेत. पुतिन यांच्यावर टीका करणारे मिम्स आणि पोस्टर्स व्हायरल झालेत. मात्र यामध्ये टाइम मासिकाच्या नावानेही दोन फोटो व्हायरल होताय. यामधील एका फोटोत पुतिन यांना हिटरलच्या मिशा लावण्यात आल्यात तर दुसऱ्या फोटोत त्यांच्या कपाळावर नाझी स्वस्तिक दिसत आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: “तिसरं विश्वयुद्ध झालं तर अण्वस्त्रांचा वापर होईल आणि…”; रशियाचं वक्तव्य

२८ फेब्रुवारी ते ७ मार्चदरम्यानच्या कालावधीसाठी प्रकाशित झालेल्या टाइमच्या अवृत्तीवरील हा फोटो असल्याचा दावा केला जातोय. या फोटोसोबत एक ओळ लिहिण्यात आलीय. “इतिहासाची पुनरावृत्ती. पुतिन यांनी कशाप्रकारे युरोपचं स्वप्न भंग केलं,” अशी ओळ या फोटोवर आहे.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: कोणी म्हणतंय हिटलर तर कोणी म्हणतंय नरकात जळणार; जगभरातील Anti-Putin मोर्चांमधील पोस्टर्स पहिलेत का?

खरं तर टाइम मासिकाच्या खऱ्या अवृत्तीवर हीच ओळ वापरण्यात आलेली आहे. मात्र फोटो हा रशियन रणगाड्यांचा आहे. युक्रेनमध्ये शिरणाऱ्या रशियन रणगाड्यांचा फोटो खऱ्या मुखपृष्ठावर छापण्यात आलाय. हा फोटो टाइम मासिकाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन शेअर करण्यात आला असून हा अंक मार्च १४-२१ चा असल्याचं म्हटलंय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांना मोठा धक्का! झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या ‘चेचेन स्पेशल फोर्स’चा युक्रेनकडून खात्मा

नक्की वाचा >> Ukraine War: बायडेन यांचा हल्लाबोल! म्हणाले, “पुतिन हुकूमशहा आहेत, ही लढाई…”

पुतिन यांना हिटरल म्हणून दाखवण्यात आलेलं टाइम मासिकाचं मुखपृष्ठ हे पॅट्रीक मुल्डेर या ग्राफिक डिझायनरने बनवलं आहे. पॅट्रीकने यासंदर्भातील स्पष्टीकरण ट्विटरवरुन दिलंय. आपल्याला रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यासंदर्भात काहीतरी बनवायचं होतं ज्या माध्यमातून लोकांमध्ये संदेश जाईल. त्याच हेतूने आपण हे मुखपृष्ठ बनवल्याचं पॅट्रीक म्हणालाय.

नक्की वाचा >> Ukraine War: “पंतप्रधान मोदी हिंमत दाखवून पुतिन यांना…”; भाजपा खासदाराने निशाणा साधत विचारला प्रश्न

पॅट्रीकने खऱ्या मुखपृष्ठामधून प्रेरणा मिळत नसल्याचं म्हटलंय. तसेच त्याने स्वत: मुखपृष्ठ कसं तयार केलं याचा व्हिडीओही पोस्ट केलाय.

जगभरातील अनेक देशांमध्ये रशिया आणि पुतिन यांच्याविरोधात आंदोलने सुरु आहेत. मात्र अमेरिका आणि युरोपियन राष्ट्रांनी निर्बंध लादल्यानंतरही रशियाने युद्धामधून माघार घेण्यास नकार देत हल्ले अजून तिव्र केलेत.