अंडर-१९ वर्ल्डकप (ICC Under 19 World Cup 2022) स्पर्धेत भारताने बांगलादेशचा पराभव केल्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी चांगलाच जल्लोष केला. मात्र, सामन्यादरम्यान, स्कोअरबोर्ड दाखवताना असं काही घडलं की अभिनेता विकी कौशलच्या (Actor Vicky Kaushal) चाहत्यांनी या सामन्यातील तो स्कोअरबोर्ड सोशल मीडियावर व्हायरल केला. इतकंच नाही, तर अनेकांनी हा स्कोअरबोर्ड विकी कौशललाही पाठवला. यानंतर विकी कौशलने या स्कोअरबोर्डचा स्क्रिनशॉट शेअर करत ‘थँक्यू इंटरनेट’ अशी प्रतिक्रिया दिली. तसेच अंडर १९ टीम इंडियाला शुभेच्छा देखील दिल्या.

अभिनेता विकी कौशलने शेअर केलेल्या आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत एक स्क्रिनशॉट आहे. या स्क्रिनशॉटमध्ये भारतीय गोलंदाजांनी घेतलेल्या बळींची माहिती दिसत आहे. त्यात पहिल्या ३ विकेट रवी कुमारने घेतल्याचं दाखवलंय. त्या खालोखाल २ विकेट घेणाऱ्या विकी ओसवाल आणि १ विकेट घेणाऱ्या कौशल तांबेचं नाव आहे. मात्र, स्क्रिनवरील मर्यादा लक्षात घेता खेळाडूंच्या आडनाव न लिहिता केवळ नाव लिहिण्यात आले. त्यामुळे स्क्रिनवर विकी आणि कौशल एका खाली एक नावे दिसली आणि विकी कौशल याच्या चाहत्यांनी हाच स्क्रिनशॉट व्हायरल केला. यावरच अभिनेता विकी कौशलने मजेदार प्रतिक्रिया दिलीय.

Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’
IPL 2024 Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: विराट कोहलीचा बायको अनुष्का आणि मुलांबरोबरचा व्हीडिओ कॉल व्हायरल
anil kumble praise ravichandran ashwin for taking 500 test wickets
आव्हानांचा निडरपणे सामना केल्यानेच अश्विन यशस्वी! भारताचा माजी कर्णधार कुंबळेकडून स्तुती

अंडर १९ विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य (सेमीफायनल) फेरीत

दरम्यान, भारताने वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप (ICC Under 19 World Cup 2022) स्पर्धेत गतविजेत्या बांगलादेशला पराभूत केलंय. तसेच उपांत्य फेरीत (सेमी फायनल) आपली जागा निश्चित केली. विशेष म्हणजे भारताने या विजयासह बांगलादेशसोबतचा बदलाही पूर्ण केला. याच बांगलादेशने २०२० मध्ये भारताला अंतिम फेरीत नमवून जेतेपदावर नाव कोरलं होतं. आता उपांत्य फेरीत भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.

या सामन्यात भारताचा कर्णधार यश धुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी कर्णधाराच्या निर्णयाचा मान राखत बांगलादेशला ३७.१ षटकात १११ धावांवर ऑलआऊट केले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी ३१ व्या षटकातच ५ विकेटने बांगलादेशला पराभवाची धूळ चारली आणि सामना खिशात टाकला.

बांगलादेशचा डाव

महफिझुल इस्लाम आणि इफ्तेखार हुसेन यांनी बांगलादेशच्या डावाची सुरुवात केली. पण सांघिक तिसऱ्या धावावर बांगलादेशला पहिला धक्का बसला. रवी कुमारने महफिझुलचा (२) त्रिफळा उडवला. त्यानंतर रवीनेच दुसरा सलामीवीर इफ्तेखार हुसेन (१) आणि त्यानंतर आलेल्या प्रांतिक नवरोजला (७) बाद करत बांगलादेशची अवस्था खिळखिळी केली. संघाच्या ५६ धावा फलकावर असताना बांगलादेशने ७ फलंदाज गमावले. त्यानंतर एसएम महरोबने ३० धावांची खेळी केली, पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ लाभली नाही. अखेर राजवर्धन हंगरगेकरने तंजीम हसन साकिबला झेलबाद करत बांगलादेशचा डाव १११ धावांवर संपुष्टात आणला. भारताकडून रवी कुमारने १४ धावांत ३, विकी ओसवालने २५ धावांत २ बळी घेतले.

भारताचा डाव

बांगलादेशच्या ११२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सुरुवातीला एक झटक बसला. हरनूर सिंह खातं न उघडताच बाद झाला. दुसरीकडे अंगकृश रघुवंशीने ४४ धावांची दमदार खेळी केली. रशीदने २६ धावा केल्या. अंगकृश आणि रशीदने ७० धावांची भागेदारी केली. मात्र, बांगलादेशचा रिपन मंडल या गोलंदाजाने ४ गडी बाद करत सामन्यातील चूरस वाढवली. त्यामुळे भारताची स्थिती ९७ वर ५ बाद अशी झाली. यानंतर भारताचा कर्णधार यश डुल (२०) आणि कौशल तांबे (११) यांनी ३१ व्या षटकातच विजय मिळवून दिला. कौशलने षटकार लगावत हा सामना जिंकला.

दोन्ही संघांची Playing 11

भारत : अंगक्रिश रघुवंशी, हरनूर सिंग, शेख रशीद, यश धुल (कर्णधार), राज बावा, कौशल तांबे, सिद्धार्थ यादव, दिनेश बाना (यष्टीरक्षक), विकी ओसवाल, राजवर्धन हंगरगेकर, रवी कुमार.

बांगलादेश : महफिझुल इस्लाम, इफ्तेखार हुसेन, प्रांतिक नवरोज नबिल, आइच मोल्ला, मोहम्मद फहीम (यष्टीरक्षक), आरिफुल इस्लाम, एसएम महरोब, रकीबुल हसन (कर्णधार), आशिकुर जमान, तंजीम हसन साकिब, रिपन मोंडोल.